[ads1]
![]()
शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धनाचे महत्त्व रुजवण्यासाठी महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन व उद्यान विभागाच्या वतीने बुधवारी आयोजित विशेष जनजागृती कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. शहरातील चार वेगवेगळ्या प्रमुख केंद्रांवर पार पडलेल्या या कार्यशाळेत ३६ शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडवल्या. ही कार्यशाळा गोरक्षण रोडवरील शुभमंगल कार्यालय, जुने शहरातील शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, रामदास पेठेतील मराठा मंगल कार्यालय आणि पातूर रोडवरील प्रभात किड्स या चार ठिकाणी एकाच वेळी घेण्यात आली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्तींमुळे पर्यावरणावर होणारे विपरित परिणाम टाळण्यासाठी शाडू मातीचा वापर करून बाप्पांची मूर्ती कशी घडवावी, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी घेतले आणि स्वहस्ते मूर्ती तयार करण्याचा आनंद लुटला. यासोबतच गणेशोत्सवातील दैनंदिन पूजेतून जमा होणाऱ्या निर्माल्यापासून खतनिर्मितीचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांना देण्यात आले. उद्घाटन महापौर शारदा खेडकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर अमोल गोगे यांच्या हस्ते झाले. या वेळी पूर्व झोन सभापती रश्मी अवचार, पश्चिम झोन सभापती राजेश्वर धोटे, उत्तर झोन सभापती जैनब बी. शेख इब्राहिम आणि दक्षिण झोन सभापती पूजा गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शरद कोकाटे, ज्ञानसागर भोकरे, अमृता सेनाड व कल्पना राव यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना मूर्ती घडवण्याचे व खतनिर्मितीचे तंत्र शिकवले. यावेळी मनपा अधिकारी आणि आजी-माजी नगरसेवकांनी केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यशाळेत मनपाची सिंधी शाळा, कृषी नगर शाळा क्र. २२, सिंधी कॅम्प शाळा क्र. १४, आदर्श कॉलनी शाळा क्र. १६, गुजराती शाळा क्र. १, पीएमश्री शाळा क्र. ७, शाळा क्र. ४, ६, ९, १२, १७, १९, २६ व हिंदी बालक शाळा यांसह अमृत कलश विद्यालय, कोठारी कॉन्व्हेंट, ज्ञानदर्पण इंग्लिश स्कूल, पुंडलिक बाबा विद्यालय (चांदूर), माउंट कार्मेल, स्कूल ऑफ स्कॉलर्स, रेणुका शाळा, खंडेलवाल ज्ञान मंदिर, नोएल स्कूल, स्मार्ट किड, न्यू इंग्लिश हायस्कूल, श्री शिवाजी विद्यालय, मनुताई कन्या शाळा, महाराष्ट्र कन्या शाळा, न्यू इरा हायस्कूल, समर्थ पब्लिक स्कूल, राजेश्वर कॉन्व्हेंट आणि मांगीलाल शर्मा विद्यालयातील इयत्ता पाचवी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मिळणार रोख पारितोषिके या चारही कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट मूर्ती घडवणाऱ्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रति कार्यशाळानिहाय प्रथम क्रमांकास पाच हजार, द्वितीय क्रमांकास तीन हजार तर तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे रोख बक्षीस अकोला महानगरपालिकेच्या वर्धापन दिनी (१ ऑक्टोबर रोजी) प्रदान केले जाईल. तसेच सहभागी सर्व तीन हजार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
[ads2]
मनपाचा उपक्रम:36 शाळांमधील विद्यार्थ्यांनी घडवल्या मातीच्या गणेशमूर्ती, शहरातील तीन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
















Leave a Reply