[ads1]
नांदेड (प्रतिनिधी) – शहरात खंडणीच्या मागणीसह जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या असून, भाग्यनगर व वजिराबाद पोलिस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल :
वेदांतनगर, मालेगाव रोड परिसरात ३ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरी आरोपी दिलीपसिंग हरीसिंग पवार, सुनील वाघमारे, लक्ष्मण पवार, अनिकेत सूर्यवंशी व बालाजी भारती यांनी कथितरित्या बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादीस खंजिराचा धाक दाखविला. तसेच फिर्यादीच्या मुलाला मारण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बेबीबाई परमेश्वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४९४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करीत आहेत.
वजिराबादमध्येही खंडणीसाठी धमकी :
दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी एस.के. मनी लॉन्ड्री परिसरात फिर्यादीकडून ३८ हजार रुपये घेऊन त्यानंतर ६० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची घटना घडली. त्यातील ५९ हजार रुपये परत केल्यानंतर पुन्हा ६० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. तसेच फिर्यादीच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कृष्णा गजानन चौधरी (वय २३, रा. जुना गंज, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये वसंत कोर गल्लीवाले, रणदिपसिंग सरदार ऊर्फ दिपू, संजना गायकवाड व राज सर्व रा. नांदेड यांचा समावेश आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दर्शन करीत आहेत. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.
Post Views: 8
[ads2]
















Leave a Reply