[ads1]
विद्यानंद बापट यांना मी काही ओळखत नाही, पण ते जे काही बोलत आहेत त्याला अर्थ आहे. कुठलाही सण हा लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेच्या आवाजामुळे त्या सणाचे गांभीर्य निघून जाते, कोणी मत व्यक्त केले म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला तर हा हल्ला माझ्यामते
.
शरद पवार म्हणाले की, पुण्याच्या पोलिस आयुक्त आणि राज्य सरकारने या लोकांकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. या कृत्याचा अनेकांनी निषेध केला त्याच्याशह मी पूर्णपणे सहमत आहे, हे सर्व थांबले पाहिजे. डीजे मुक्त सारखे निर्णय घेण्याची गरज आहे.
डीजेला विरोध केल्याने हल्ला, बापट म्हणाले…
विद्यानंद बापट म्हणाले की, मी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना एक वेडा आला व हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. पोलिसांनी त्याला चौकीत नेऊन तुडवून काढावे. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. उत्सवावर आक्षेप नाहीच.
पुण्यात ‘डीजे’च्या आवाजाला चाप
दुसरीकडे पुणे शहरात गणेशोत्सवात साऊंड सिस्टीममध्ये 4 बेस, 4 टॉपचाच वापर करावा, असे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. नियमाचे पालन केले नाही तर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.
बेस व टॉप म्हणजे काय?
बेस : साउंड सिस्टीममधून येणारा जड व धडधडणारा आवाज. ढोल, ताशा किंवा गाण्यातील खालच्या पट्टीचा आवाज बेसमधून येतो. मोठा बेस स्पीकर जास्त हवा हलवतो, त्यामुळे आवाजासोबत कंपनेही जाणवतात.
टॉप : साउंड सिस्टीममधून आवाज स्पष्ट ऐकवणारा स्पीकर. गायकाचा आवाज, गाण्याचे शब्द, भाषण व वाद्यांमधील बारीक आवाज टॉपमधून ऐकू येतात. टॉपमध्ये मध्यम आणि तीव्र आवाज तयार होतो. हे ही वृत्त वाचा ध्वनिप्रदूषणावर बोलणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण, धमकी:महाराष्ट्र अंनिसकडून तीव्र निषेध, पोलिसांना कठोर कारवाईची मागणी

पुण्यातील टिळक रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण करून धमकी दिल्याच्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) तीव्र निषेध केला आहे. बापट हे ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
अंनिसचे मिलिंद देशमुख आणि नंदिनी जाधव यांनी सांगितले की, ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न कोणत्याही एका धर्माचा, उत्सवाचा किंवा व्यक्तीचा नाही. तो नागरिकांचे आरोग्य, शांततेने जगण्याचा अधिकार आणि कायद्याचे पालन याच्याशी संबंधित आहे. या प्रश्नावर मतभेद असल्यास युक्तिवाद, चर्चा आणि लोकशाही मार्गाने उत्तर देता येते. वाचा सविस्तर गणेशोत्सवात प्लाझ्मा, प्रेशर, मिड, लेझर बंदीला असोसिएशनचा पाठिंबा:पुणे साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशनची पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान प्लाझ्मा, प्रेशर, मिड आणि लेझर यांच्या वापरामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर बंदी घालण्याच्या पोलिसांच्या निर्णयाला साऊंड अँड इलेक्ट्रिकल्स जनरेटर्स असोसिएशन, पुणे यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली. वाचा सविस्तर
[ads2]
















Leave a Reply