[ads1]
छत्रपती संभाजीनगर शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या एशियन हॉस्पिटलमध्ये पहाटे 2.45 वाजेच्या सुमारास लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात (NICU) एसीच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने अग्निशमन दल, पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्
.
आग लागली त्यावेळी एनआयसीयू (NICU) विभागात 9 लहान मुले उपचार घेत होती. आगीचे वृत्त समजताच आपत्कालीन यंत्रणांनी धाव घेत या सर्व बालकांना तातडीने बाहेर काढले. यातील 5 बालकांना घाटी रुग्णालयात, 3 बालकांना एमजीएम रुग्णालयात, तर एका बालकाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
10 ते 15 मिनिटांत आगीवर नियंत्रण
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या 10 ते 15 मिनिटांत आग आटोक्यात आणली, ज्यामुळे आग इतर मजल्यांवर पसरण्यापासून रोखता आली.

30 रुग्णवाहिकांचा ताफा आणि पोलिसांची तत्परता
रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आणि बचावकार्यासाठी जवाहरनगर पोलीस तसेच आरसीपी (RCP) चे जवान मोठ्या पोलीस बंदोबस्तासह तात्काळ घटनास्थळी हजर झाले. विशेष म्हणजे, रुग्णांना इतर रुग्णालयांत वेळेवर हलवण्यासाठी तब्बल 30 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

पहिल्या मजल्यावर होते 58 रुग्ण
हॉस्पिटलचा एनआयसीयू (NICU) विभाग पहिल्या मजल्यावर असून, या विभागात 9 रुग्ण उपचार घेत होते. तसेच, याच मजल्यावरील जनरल विभागात एकूण 36 रुग्ण आणि स्पेशल रूममध्ये 13 रुग्ण असे एकूण 58 रुग्ण उपचार घेत होते. यंत्रणांच्या वेगवान हालचालींमुळे सर्वांना वेळीच सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले आहे.
[ads2]
















Leave a Reply