प्रसिद्ध कवीयात्री गुंजन पाटील यांच्या बहारदार कविता आणि कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन ; हदगावात शेतकऱ्यांसाठी पर्वणी

प्रतिनिधी शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट.

सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त हदगाव येथे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन व बहारदार कवितांचा पर्वणी असणाऱ्या भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:३० वा. सुमन गार्डन मंगल कार्यालय, हदगाव येथे हा भव्य शेतकरी मेळावा व कृतज्ञता सोहळा होणार आहे.

 

या मेळाव्यात दोन प्रमुख आकर्षणे असणार आहेत.

१. बहारदार काव्य मैफील :

महाराष्ट्राची लोकप्रिय कवयित्री *गुंजन पाटील* या शेतकऱ्यांच्या जीवनावर, ग्रामीण वास्तवावर आणि शेतीच्या प्रश्नांवर आपल्या मिश्किल आणि विनोदी शैलीत बहारदार कविता सादर करणार आहेत. त्यांच्या कवितेतून शेतकऱ्याचे जगणे, त्याचे कष्ट आणि त्याचा आनंद उलगडणार आहे.

२. शास्त्रज्ञांचे थेट मार्गदर्शन :

सध्या कापूस, सोयाबीन आणि हळद पिकावर आलेल्या विविध कीड व रोगांमुळे शेतकरी चिंतेत आहे. यावर उपाय म्हणून *वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ* या मेळाव्यात शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करणार आहेत. पिकांवरील बोंडअळी, खोडकिडा, पिवळा मोझॅक आणि करपा रोगावरील नियंत्रण, उसावरील पांढरी माशी यावर उपाययोजना सविस्तर माहिती दिली जाणार आहे,याशिवाय महायुती सरकारने जाहीर केलेल्या *पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबद्दल* सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, जिल्ह्यातील सन्माननीय आमदार,खासदार, लोकप्रतिनिधीbविविध पक्षाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत,शेतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन आणि बहारदार कवितांचा कार्यक्रम दुहेरी संगम असणाऱ्या मेळाव्यास सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक भागवत देवसरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *