परतवाडा शहरातील दुराणी चौकात सुलभ शौचालयाचे बांधकाम पूर्ण होऊनही ते अद्याप खुले झालेले नाही. यामुळे परिसरातील व्यावसायिक, खरेदीसाठी येणाऱ्या महिला आणि दुकानांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अचलपूर नगरपालिकेच्या हद्दीतील या गजबजलेल्या चौकात अनेक महिन्यांपूर्वी हे शौचालय बांधले गेले. मात्र, पालिकेच्या दुर्लक्षामुळे ते वापराविना पडून आहे. नगरसेविका अपर्णा रोडे यांनी मुख्याधिकारी धीरज गोहाड यांना निवेदन देऊन हे शौचालय तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे. मुख्याधिकारी धीरज गोहाड यांनी आश्वासन दिले आहे की, विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता ३१ ऑक्टोबरला संपल्यानंतर हे शौचालय लगेच सुरू केले जाईल. हे शौचालय ‘पे अँड यूज’ तत्वावर आधारित आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 7 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation करा जिल्ह्यात 14,186 असाक्षर नागरिक आज देणार परीक्षा:सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत कोणतेही 3 तास द्यावे लागणार, 14 तालुक्यांत 1,435 केंद्रे मराठवाड्यात 9 महिन्यांत तब्बल 760 शेतकऱ्यांच्या आत्महत्या:पावसाने पाठ फिरवल्यानंतर सप्टेंबर महिन्यातच 108 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले