नांदेड रेल्वे  पोलिसांच्या ताब्यातून दोन आरोपी बेड्यासह फरार; सीसीटीव्ही असूनही गुप्ततेचा पडदा


नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्थानकावरून पोलिसांच्या ताब्यात असलेले दोन संशयित आरोपी फरार झाल्याची धक्कादायक आणि खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे, या दोघांना हैदराबादमधून आणण्यात आले होते. रेल्वे स्थानक परिसरात चारही बाजूंनी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही ही घटना घडली असून, संपूर्ण प्रकाराबाबत पोलिसांनी मात्र गूढ शांतता पाळल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी संशयाच्या आधारावर या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या तपासाच्या पद्धतीनुसार, शंकेच्या धाग्यापासून सुरुवात करून प्रत्यक्ष पुराव्यांपर्यंत पोहोचणे हा त्यांचा कार्यभाग असतो. त्याच अनुषंगाने या दोघांकडून काही गुन्ह्यांमधील चोरीचा ऐवजही हस्तगत झाल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र, या ताब्याची कायदेशीरता आणि प्रक्रिया यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या दोन आरोपींना एका हातकडीने बांधून ठेवण्यात आले होते. 17 मार्चच्या रात्रीपासून ते 18 मार्चच्या पहाटेपर्यंत त्यांना अशाच स्थितीत ठेवण्यात आले होते. याच दरम्यान, आरोपींनी संधी साधत पोलिसांच्या हातावर तुरी देत अक्षरशः सटकून पळ काढला. एवढ्या कडक बंदोबस्तात आणि सीसीटीव्हीच्या जाळ्यातून आरोपी कसे पसार झाले, हा मोठा सवाल निर्माण झाला आहे.

या प्रकरणाची अधिकृत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता, सर्व स्तरांवरून दारे बंद असल्याचे दिसून आले. पोलिसांकडून कोणतीही अधिकृत नोंद किंवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर येत आहे. जर तत्काळ गुन्हा दाखल केला असता, तर गुप्तता पाळण्याची वेळच आली नसती, असा सवाल उपस्थित होत आहे.

पोलिसांच्या कामगिरीत वेग, कौशल्य आणि गुन्हे उघडकीस आणण्याची क्षमता असते, हे खरे असले तरी, अशा प्रकारच्या घटनांमुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होतात. गुप्ततेच्या आड लपवला जाणारा हा प्रकार आता उघडकीस येऊ लागला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक बनले आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे नांदेड रेल्वे विभागात कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून,



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *