अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात (पीडीएमसी) अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर उभारण्यात आले आहे. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या सहकार्याने येथे पेट स्कॅन, सिटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध होणार आहेत. सध्या अमरावतीत पेट सीटी स्कॅनची सुविधा नसल्याने नागरिकांना नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जावे लागते. ही अडचण दूर करण्यासाठी पीडीएमसी आणि स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. पश्चिम विदर्भातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हे सेंटर उभारले जात आहे. संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी यांनी यासाठी पुढाकार घेतला. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातही संस्थेने सहकार्य केले. ही सुविधा वर्षभरात सुरू होण्याची शक्यता आहे. खाजगी रुग्णालयांच्या तुलनेत येथील दर २५ टक्क्यांपर्यंत कमी असतील, ज्यामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांनी सांगितले.
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%