![]()
प्रतिनिधी |पाचोड “आपल्या जीवनामध्ये योग्य आचरण ठेवा. योग्य वर्तन ठेवा. दुर्व्यसनांचा त्याग करा. दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका. गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ धारण करा. सर्वांशी समतेने वागा,” असे परखड व प्रेरणादायी मार्गदर्शन सागर महाराज शास्त्री दुधडकर यांनी केले. हर्षी (ता. पैठण) येथे सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने शनिवारी सप्ताहास प्रारंभ झाला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सागर महाराज शास्त्री दुधडकर यांची कीर्तन सेवा झाली. या वेळी कीर्तनातून त्यांनी उपस्थित भाविकांना जीवनमूल्यांचा संदेश दिला. ते म्हणाले, “आई-वडिलांची सेवा करा, वडीलधाऱ्यांचा मान राखा, भगवंताचे नामस्मरण करा, हाच खरा व सोपा परमार्थ आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही परमार्थ नाही.” कीर्तनप्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात हरिनामाच्या गजरात सप्ताहाची सुरुवात उत्साहात झाली.
योग्य वर्तन ठेवा, दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊ नका:सागर महाराज शास्त्री दुधडकर
