Sunday, 18 October 2026 | नांदेड आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
ताज्या बातम्या • अचूक माहिती • आपल्या शहराचा आवाज
जाहिरातीसाठी येथे जागा
⌕
ब्रेकिंग न्यूज
गावंडगाव आणि अडगावात सहा गाढवांचा अचानक मृत्यू:विषारी हरभरे खाऊ घातल्याचा संशय, मालकाने पोलिसांत तक्रार केली; तपास सुरु कुरुक्षेत्र विद्यापीठात स्कॉर्पिओने स्कूटीस्वार तरुणींना उडवले:टोकल्यावर प्राध्यापकाला मारहाण; विद्यार्थी म्हणाले- पोलीस आरोपींचा वाढदिवस साजरा करत आहेत बावनकुळे यांच्या एसआयटीच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार:अमरावतीत हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांचे जोरदार प्रत्युत्तर लव्ह मॅरेजच्या 16 वर्षांनंतर पतीची हत्या:पत्नीचा बॉयफ्रेंड बाउन्सर; घरात बदमाश घुसल्याची कहाणी रचली तिवसा तालुक्यातील रस्ते, पुलांच्या दुरुस्तीला गती देण्याची मागणी:वंचित बहुजन आघाडीने जि.प. कार्यकारी अभियंत्यांना दिले निवेदन
Business

गावंडगाव आणि अडगावात सहा गाढवांचा अचानक मृत्यू:विषारी हरभरे खाऊ घातल्याचा संशय, मालकाने पोलिसांत तक्रार केली; तपास सुरु

October 17, 2026 · admin · प्रतिक्रिया नाही




अंजनगावसुर्जीतील गावंडगाव येथे चार, अडगाव खाडे येथे दोन, अशा सहा गाढवांचा अचानक मृत्यू झाला. मालक रमेश सुरजुसे (वय ६५) यांनी पोलिसांत तक्रार केली. सुरजुसे यांच्याकडे १० गाढवे होती. १६ ऑक्टोबर रोजी सकाळी एक गाढव मृत झाले, तासाभरात आणखी तीन. आजारी गाढवांना अडगावला आणले, तिथे आणखी दोन मृत पावली. रहीमपूरचे ठाणेदार प्रशांत देशमुख यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर चव्हाण व शिपाई आदिनाथ खाडे यांना पंचनामा व शवविच्छेदनाचे निर्देश दिले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए.बी. बचे यांच्यासह डॉ. रणदिवे, डॉ. प्रशांत सुरजुसे, डॉ. आदेश चोपडे, डॉ. सोपान ठाकरे, हाडोळे, अक्षय तायडे, जुनघरे यांनी शवविच्छेदन केले. अज्ञात व्यक्तीने विषारी हरभरे खाऊ घातल्याचा संशय आहे. प्रत्येक गाढवाची किंमत १७-१८ हजार रुपये असून, एकूण १ लाख ८ हजार रुपयांचे नुकसान झाले. अहवाल आठवडाभरात येईल, त्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *