अर्धापूरमध्ये सोन्याच्या अंगठ्या पळवून वृद्धाची फसवणूक; ७० हजारांचा ऐवज लंपास ; तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल


अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर तालुक्यातील भारत पेट्रोलपंपाजवळ तीन अनोळखी व्यक्तींनी पोलिसांची बतावणी करून एका वृद्धाला गंडा घातल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपींनी वृद्धाच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, किंमत अंदाजे ७० हजार रुपये, चलाखीने काढून घेत फसवणूक केली.

या प्रकरणी संभाजी दत्ताराम पवार (वय ६४ वर्षे, रा. अमरापूर, ता. अर्धापूर) यांनी अर्धापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, भारत पेट्रोलपंपाजवळ तीन अनोळखी आरोपींनी आपण पोलीस असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. आरोपींनी फिर्यादीची दिशाभूल करून सोन्याच्या अंगठ्या घेऊन तेथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संभाजी पवार यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५७४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३१८(४), ३१९(२), २०४ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस उप निरीक्षक गोणारकर करीत आहेत. आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.


Post Views: 354










Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *