![]()
स्ट्रॉबेरी इंग्लिश स्कूल, श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, शारदा विद्या मंदिर या शाळांनी गायन, पथनाट्य, मल्लखांब, वादनाचे कार्यक्रम तसेच योगा प्रात्यक्षिक सादर केले. तसेच झुंबा डान्स, ओंकार केसेकर यांच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिक, अरविंद
.
संगमनेर रोटरी क्लब संगमनेर तर्फे आयोजित ‘आनंदी रस्ते’ हा उपक्रमाचे. रोटरी क्लब आपली १२१ वर्षे पूर्ण करीत आहे, त्यानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला.
शहरातील आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार सुधीर तांबे, रोटरी डिस्ट्रीक्टचे असिस्टंट गव्हर्नर अमोल वैद्य, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे आदी उपस्थित होते. या उपक्रमाची संकल्पना दिलीप मालपाणी यांनी संगमनेरमध्ये पहिल्यांदा राबवली. या निमित्त विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जायंट गोरिला हा बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण होते. वर्मा आर्टस् चे संचालक अक्षय वर्मा यांनी रस्ते सुशोभिकरणाचे असे काम केले.
आमदार अमोल खताळ म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम रोटरी क्लब नेहमी राबवत असतात त्याबद्दल मी रोटरीच्या टिमचे अभिनंदन करतो. या कार्यक्रमात लहानांपासून, मोठ्यांपर्यंत, आमच्या लाडक्या बहिंणींसह, बच्चे कंपनी यात सामील झाले आहे. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, रोटरी क्लब सामाजिक कामांसाठी ओळखला जातो विशेषत: एकल महिलांसाठी त्यांनी केलेले काम फार मोठे आहे. आजचा हा उपक्रम सुद्धा फार महत्त्वाचा आहे, जीवनात आनंदी असणे व दुसऱ्याला आनंदी ठेवणे यासारखी दुसरे मोठे काम नाही, हे काम रोटरी क्लब उत्साहाने करीत आहे.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब संगमनेरचे अध्यक्ष विश्वनाथ मालाणी, सेक्रेटरी सौरभ म्हाळस, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, खजिनदार संकेत काजळे तसेच प्रकल्प प्रमुख समीर शहा, धीरज देशमुख, प्रकल्प समन्वयक अजित काकडे, नरेंद्र चांडक, सीए संजय राठी, दिपक मणियार, राजेंद्र खोसे, भारतभूषण नावंदर, आनंद हासे, विकास लावरे, डॉ. किशोर पोखरकर व रोटरी सदस्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचा समारोप पावणे दोन हजार चौरस फूटाचा तिरंगा फडकावून करण्यात आला. वंदे मातरमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला.
