स्वच्छता ही सेवा 2026 अभियानांतर्गत युनिव्हर्सलच्या विद्यार्थ्यांचा स्वच्छता संदेश !

स्वच्छता ही सेवा 2026 अभियानांतर्गत युनिव्हर्सलच्या विद्यार्थ्यांचा स्वच्छता संदेश!

नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता ही सेवा २०२६ अभियानांतर्गत युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल, नांदेडच्या वतीने तरोडा परिसरातील विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या वॉकिंग ट्रॅकवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

मुख्याध्यापिका सौ. ज्योत कौर जितेंद्रसिंह पहाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छतेचा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

वॉकिंग ट्रॅकवर काही नागरिकांकडून खाद्यपदार्थांची पाकिटे, प्लास्टिकच्या पिशव्या व इतर कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ होत आहे. सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, त्यासाठी “सिविक सेंस” जपणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी आपल्या उपक्रमातून अधोरेखित केले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता, सामाजिक जबाबदारी, नेतृत्वगुण आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाची भावना विकसित झाली. अनुभवाधारित व कौशल्याधारित शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूलच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *