
संगम अर्बन मल्टिस्टेटच्या वतीने बालाजी भक्तांना फळे व फराळाचे वाटप
अध्यक्ष गजानन अच्युतराव वडजे यांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; आर्थिक विश्वासासोबत सेवाभावालाही प्राधान्य
नांदेड प्रतिनिधी :
आर्थिक क्षेत्रातील वाटचालीसोबत सामाजिक बांधिलकी जपत संगम अर्बन मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नांदेड यांच्या वतीने मुखेड ते नरसी येथील श्री बालाजी मंदिराकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना फळे व फराळाचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष गजानन अच्युतराव वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून भाविकांप्रती आपुलकी आणि सेवाभाव जपण्याचा संदेश देण्यात आला.
नांदेड येथील नवीन मोंढा परिसरात मुख्य कार्यालय असलेल्या संगम अर्बन मल्टिस्टेटने अल्पावधीत सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेच्या माहितीनुसार, स्थापनेच्या अवघ्या दोन वर्षांत ३५ कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला असून शून्य अनुत्पादित कर्जाचे उद्दिष्ट कायम राखण्यावर संस्थेचा भर आहे. ठेवीदारांचा विश्वास, आर्थिक शिस्त आणि ग्राहकाभिमुख सेवा ही संस्थेच्या वाटचालीतील महत्त्वाची वैशिष्ट्ये ठरत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष गजानन अच्युतराव वडजे यांना आर्थिक व्यवहारांची जाण आणि सहकार क्षेत्राच्या विकासाचे महत्त्व यांची जाणीव असून, आर्थिक प्रगतीसोबत सामाजिक उत्तरदायित्वालाही त्यांनी महत्त्व दिले आहे. सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक व्यवहारांपुरते मर्यादित नसून समाजाशी नाते जोडणारे माध्यम आहे, या भावनेतून अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळत आहे.

भाविकांना फळे व फराळाचे वाटप हा उपक्रम धार्मिक श्रद्धेचा सन्मान करण्याबरोबरच समाजातील आपुलकीची भावना वृद्धिंगत करणारा ठरला. आर्थिक विश्वासार्हता आणि सामाजिक जाणीव यांचा समन्वय साधत संगम अर्बन मल्टिस्टेटची वाटचाल सुरू आहे.
‘नातं जपणारी… आपुलकीची सेवा!’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे आणि अर्थकारणासोबतच सामाजिक क्षेत्रातही संस्थेची नाळ सामान्य जनतेसोबतही जपण्याचे कार्य वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून जात आहे .

