![]()
प्रतिनिधी | लाडसावंगी शिवरायांचे चांगले विचार जीवनात अमलात आणून आजच्या तरुण तरुणीने हातात तलवार नाही तर पेन पुस्तक घेऊन शिक्षण घेण्याची गरजेचे आहे व संगणकाचा वापर करून तंत्रज्ञानाची स्पर्धा करण्याची वेळ असून अंधश्रद्धेला गाडून टाकून अंधश्रद्धा दूर केली पाहिजे अंधश्रद्धा कोणी बाळगता कामा नये तुम्ही तरुण तरुणी आहात पडेल तो व्यवसाय करा मिळेल ते काम करा चांगले माणूस म्हणून जगायला शिका असे मत मधुकर महाराज बारुळकर यांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. भांबर्डा ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथे शिवछत्रपती प्रतिष्ठाण भांबर्डा वतीने डीजेमुक्त शिव जन्मोत्सव साजरा करून व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात प्रसंगी ते बोलत होते. या या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना वंदन पूजन करून करण्यात आली. त्यानंतर मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष धनंजय पाटील यांनी शिवचरित्र हे वाचून चालणार नाही तर ते तरुणांच्या आचरणात आणले पाहिजेत असे बोलताना मत व्यक्त केले. तसेच मराठा सेवा संघ प्रवक्ते संजीव साठे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार समाजाला दिशा देणारे होते. त्यामुळे त्यांचे विचार आजच्या तरुणांना कळणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. प्रस्ताविक प्रतिष्ठाण अध्यक्ष सुदाम पठाडे यांनी केले तर आभार तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम काळे यांनी मानले. यावेळी सरपंच भीमराव पठाडे, अनिल दौड, श्रीराम भवर, माजी सरपंच भीमराव साळुंके, मच्छिंद्र दिवटे, आबासाहेब पठाडे, ज्ञानेश्वर दाभाडे, गणेश हरणे, श्रीकांत पठाडे, सौरभ पठाडे, परमेश्वर काळे, सोपान काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थितीत होते. शिवछत्रपती प्रतिष्ठाण भांबर्डा सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते.
आता हातात पेन पुस्तक घेऊन तंत्रज्ञानाशी झुंज द्यायला शिका:मधुकर महाराज बारुळकर
