राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांसाठी जाहीर केलेली सध्याची मदत ही केवळ दिवाळीपुरती भेट असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य जालन्याच्या पालकमंत्री आणि दुष्काळ निवारण समितीच्या सदस्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. शेतकऱ्यांना दिलेली मदत तुटपुंजी आहे, या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, पिकांच्या नुकसानीपोटी मिळणारी थेट मदत, पीक विमा आणि केंद्राकडे दुष्काळ निवारणाचा अहवाल गेल्यानंतर मिळणारा निधी या सर्व वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना आणखी दिलासा मिळेल, असे त्यांनी सूचित केले. सध्या जालना जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून वाढते तापमान, आटलेले जलस्रोत आणि उन्हामुळे करपलेली पिके यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर, जालना जिल्हाधिकारी कार्यालयात चारा छावण्या आणि इतर उपाययोजनांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण दुष्काळ आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी दुष्काळ निवारणाबाबत सरकारची भूमिका आणि पुढील दिशा स्पष्ट केली. पंकजा मुंडे म्हणाल्या, सध्या चारा डेपो सुरू करण्याला प्राधान्य असून, गरज पडल्यास चारा छावण्या सुरू केल्या जातील. छावण्यांमध्ये सीसीटीव्ही आणि जनावरांचे जिओटॅगिंग केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात असून, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन आणि गाव दत्तक घेण्याचे आवाहनही करण्यात येत असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, दुष्काळाची परिस्थिती गंभीर अति गंभीर होत चालली आहे. त्यामुळे चाऱ्याचे नियोजन आणि पिण्याच्या पाण्याचा नियोजनावर सरकार डोळ्यात तेल घालून काम करत आहे. दर मंगळवारी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होते. मुख्यमंत्री त्याचा आढावा घेतात. येत्या काही दिवसांमध्ये जमिनीमधील पाण्याचे आर्द्रता आणखी कमी होईल. त्यामुळे चाऱ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. चारा छावण्यांची गरज भासेल तेव्हा त्याबाबत विचार केला जाईल. सुरुवातीला चारा गावोगावी पोहोचवण्यासाठी चारा डेपो, नंतर गाव पातळीवर छावणी आणि गरज भासली तर चारा छावण्यांचा विचार केला जाईल, असे मुंडे म्हणाल्या. दुष्काळ निवारण आणि पुढील उपाययोजना केंद्रीय पथकाने नुकसानाची पाहणी केली असून पंचनामे पूर्ण होत आले आहेत. यानंतर यासंदर्भातील अहवाल लवकरच केंद्राकडे पाठवला जाईल. केंद्र सरकारच्या पथकांनी स्वतःच्या डोळ्यांनी धरण कोरडे झालेले आणि पीक पूर्ण उद्ध्वस्त झालेले पाहिले आहे. दोन्ही सरकार आणि जालन्याची पालकमंत्री म्हणून मी डोळ्यात तेल घालून परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी मार्गदर्शन, सामूहिक लग्न सोहळ्यांवर भर देणे आणि मोठ्या उद्योजकांनी गावे दत्तक घेऊन त्यांची व्यवस्था बघणे, यावर आपण येणाऱ्या काळात काम करणार आहोत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मदतीवरील टीकेला उत्तर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे म्हणणाऱ्यांना मी एवढेच म्हणेन की, पिकाच्या नुकसानाची मदत, त्यात विमा वेगळा आणि केंद्राकडून मिळणारी मदत वेगळी असते. पूर्वी आम्ही जशी अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, याचा अर्थ त्यांना बाकीची मदत मिळत नाही असा अर्थ कोणी काढत असेल, तर त्यांचा अभ्यास चुकीचा आहे. सध्या दिली जाणारी मदत ही दुष्काळापूर्वी दिवाळीसाठी म्हणून दिली जाणारी केवळ एक अग्रिम रक्कम आहे, हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्याची मदत ही केवळ दिवाळीची भेट:आगामी काळात आणखी मदत मिळणार; पंकजा मुंडेंचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर