पहिल्या कारवाईत २८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.५० वाजता सायखेड फाट्यानजीक बोलेरो पिकअपमधून ६५ युरिया खताच्या बॅगा (किंमत १,३०,२९२ रुपये) वाहतूक करताना आरोपींना पकडण्यात आले. या प्रकरणी कृषी अधिकारी विशाल वसंतराव चंदापुरे यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कराड करीत आहेत.
दुसऱ्या कारवाईत २८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता यवळ (ता. धर्माबाद) येथे टेम्पोमधून ७० युरिया खताच्या बॅगा (किंमत १,४०,३१५ रुपये) अवैधरीत्या वाहतूक करताना दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणीही कृषी अधिकारी विशाल चंदापुरे यांच्या फिर्यादीवरून धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध रासायनिक खत (नियंत्रण) आदेश १९८५, आवश्यक वस्तू अधिनियम १९५५, फर्टिलायझर (मुव्हमेंट कंट्रोल) ऑर्डर १९७३ तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास धर्माबाद पोलीस करीत आहेत.
Post Views: 303
