सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या CRS पोर्टलचा गैरवापर; 15,569 बनावट जन्मनोंदी प्रकरणी झारखंडमधून आरोपी अटक


उस्मानगर (प्रतिनिधींची)-  कंधार तालुक्यातील मौजे सावळेश्वर ग्रामपंचायत येथील शासनाच्या (CRS) पोर्टलवरील युजर आयडीचा गैरवापर करून तब्बल 15,569 बनावट जन्म नोंदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


या प्रकरणी ग्राम पंचायत अधिकारी भावना माधवराव कावळे ( 35) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र शासनाची फसवणूक झाल्याने उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा  क्रमांक 18/2026 अंतर्गत कलम 318(4), 337, 336(3), 340(2), 338 BNS सहकलम 65, 66 माहिती तंत्रज्ञान अधिनीयम दाखल करण्यात आला आहे. 
पोलीस स्टेशन उस्माननगर येथे दाखल गुन्ह्यानुसार, सावळेश्वर ग्रामपंचायतीच्या (CRS) पोर्टलवरील युजर आयडी क्रमांक MH20362RE हा फिर्यादीच्या ताब्यात असताना अज्ञात व्यक्तींनी ऑनलाईन पद्धतीने त्या आयडीचा गैरवापर केला. फिर्यादीची संमती नसताना मोठ्या प्रमाणावर बनावट जन्मनोंदी नोंदविण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.

सायबर सेल नांदेडच्या मदतीने व गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने वरिष्ठांच्या परवानगीने झारखंड राज्यातील रांची व गढवा जिल्ह्यात जाऊन सखोल चौकशी केली. तपासादरम्यान जितेंद्र कुमार सिंह पि. महेंद्र प्रसाद सिंह वय 52 वर्षे व्यवसाय बिल्डर रा. अमराखास पो. कोचिया ता. बिशुनपुर जि. गढवा,  ओम प्रकाश मिश्रा पि. उमेश मिश्रा वय 33 वर्षे व्यवसाय इंटरनेट सेंटर चालक रा. पाको रोड रेडमा ता. डाल्टनगंज जि. पलामु ह.मु. अशोकनगर रोड नं.02 ता. अरगोडा जिल्हा रांची, लक्ष्मी पंडीत पति अमीत कुमार पंडित वय 34 वर्षे व्यवसाय खाजगी नौकरी रा. A/3 अशोकपुरम अशोकनगर विपरतरोड नं.4 ता.जि. रांची, सुमीत कुमार सिंह पि.निर्मल सिंह वय 27 वर्षे व्यवसाय C.S.C. सेंटर चालक रा. बजरा बडका टोली ता. हेहल जि. रांची, 5) सतिश कुमार पि. भवानी शाहु वय 35 वर्षे व्यवसाय C.S.C. सेंटर चालक रा. हेधु पोस्ट हटीया ता. नामकुम जि. रांची राज्य झारखंड यांचा  सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना झारखंडमधून अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी (रिमांड) मंजूर केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास लोहाचे पोलीस निरीक्षक एन. एस. आयलाने,  हे करीत आहेत. उस्माननगर पोलीसांनी केलेल्या या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस उप अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे.उस्मानगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार,पोलीस उप निरीक्षक सुनील सूर्यवंशी,पोलीस अंमलदार लोपामुद्रा आणेराव (कुबडे),सुशील कुबडे,तुकाराम पवार,साईनाथ मोरे,प्रकाश पेद्देवाड,दीपक ओढणे यांनी सुद्धा मेहनत घेतली. या प्रकरणातील आरोपींची बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून झारखंड मध्ये दुसऱ्याच्या संपत्तीवर कबजा करण्याचा प्रयंत्न केला आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *