एमव्हीके उद्योग समूहाच्या चौथ्या साखर कारखान्याचे गुरुवारी उद्घाटन

एमव्हीके उद्योग समूहाच्या चौथ्या साखर कारखान्याचे गुरुवारी उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ; माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण राहणार अध्यक्षस्थानी

उमरी : नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या एमव्हीके उद्योग समूहाच्या चौथ्या साखर कारखान्याचा उद्घाटन सोहळा गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता कुसुमनगर, वाघलवाडा येथे आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कारखान्याचे उद्घाटन होणार असून, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत.

या सोहळ्याला राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, सहकार क्षेत्रातील मान्यवर तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती एमव्हीके उद्योग समूहाचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी दिली.

या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय खासदार नितीन पाटील, खासदार अजित गोपछडे, खासदार हेमंत पाटील, खासदार रवींद्र पाटील चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजे नवघरे, आमदार श्रीया चव्हाण, आमदार आनंदराव बोरकर, आमदार जितेंद्र अंतापूरकर, आमदार बापूराव कदम, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार रामराव पाटील मुधोळकर, आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार भीमराव केराम आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

ऊस उत्पादक शेतकरी आणि ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने या कारखान्याच्या उभारणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याकडे जिल्ह्यातील सहकार आणि साखर उद्योग क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *