जेन-झीची इच्छा, नोकरी लागताच घर:74% खरेदीदार 35 वर्षांपेक्षा लहान; घर खरेदीचे सरासरी वय 6 वर्षांत 38 वरून 34 वर्षे झाले




पैसा जमा करा… मग घर खरेदी करा. किमान डाऊनपेमेंट इतकी तरी रक्कम जवळ असू द्या. सामान्य भारतीय कुटुंबांची ही विचारसरणी आता जुनी होत आहे. आता नवीन ट्रेंड सुरू झाला आहे – नोकरी लागताच घर खरेदी करा. देशात विकल्या जाणाऱ्या ७४% घरांची खरेदी ३५ वर्षांपेक्षा कमी वयाचे तरुण करत आहेत. यामध्येही ३२% खरेदीदार २५ वर्षांपेक्षा लहान आहेत. घर खरेदी करणाऱ्यांचे सरासरी वय अवघ्या ६ वर्षांत ३८ वरून ३४ वर्षांवर आले आहे. होम लोन ॲग्रीगेशन आणि डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म ‘बेसिक होम लोन’च्या ‘घर का सपना कैसे पूरा करता है भारत’ या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, स्वतःच्या घराची ओढ इतकी तीव्र आहे की, उच्च उत्पन्न गट वार्षिक कमाईच्या ५०% पर्यंत ईएमआय भरण्यास तयार आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे होणारी जलद प्रोसेसिंग तरुण खरेदीदारांना आकर्षित करत आहे. मात्र, हे तरुण कर्जासाठी ५० वर्षे जुनी आणि विश्वासार्ह संस्थेकडेच जातात. हे सर्वेक्षण वेगवेगळ्या वयोगटातील आणि उत्पन्न गटातील २३ हजार लोकांवर करण्यात आले. यामध्ये ३१% लोकांचे वार्षिक उत्पन्न ५० लाखांहून अधिक होते. घर खरेदी : ‘जेन-जी’साठी मित्रांचा सल्ला कमी महत्त्वाचा होम लोन : निर्णयात व्याजदर सर्वात महत्त्वाचे व्याजदर: मिलेनियल आणि जेन-झीमधील ५०% लोक म्हणतात होम लोनमध्ये व्याजदर सर्वात महत्त्वाचे आहेत. व्याजदरातील थोडासा बदलही परिणाम करतो. मंजुरीची वेळ: कर्ज प्रोसेसिंगच्या वेळेला महत्त्व. बँक किंवा प्लॅटफॉर्म अर्जानंतर २४ किंवा ४८ तासांत कर्ज प्रक्रिया पूर्ण करतात, त्यांनाच पसंती. विश्वास: विश्वासार्ह संस्थेकडेच कर्जासाठी जातात. ६० वर्षांहून अधिक वयाचे ३३% लोक कर्जासाठी बँकेच्या शाखेत जाणे पसंत करतात. पारदर्शकता: प्रक्रियेतील पारदर्शकता, शुल्कावर स्पष्टता आणि छुपे चार्जेस या गोष्टी संस्थांच्या विश्वासार्हतेवर परिणाम करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *