बँक भरती घोटाळा- CBIचा 6 राज्यांत छापा:5 वर्षे जुने रेकॉर्ड तपासले, आय स्कॅनमध्ये 172 बोगस अधिकारी निष्पन्न; सर्वांची नोकरी जाणार

[ads1]


सीबीआयने बँक भरतीतील पाच वर्षे जुन्या डेटाची तपासणी करून नोकरी मिळवलेल्या बनावट उमेदवारांचा पर्दाफाश केला आहे. परीक्षेत घेतलेल्या डोळ्यांच्या स्कॅनच्या (आयरिस) आधारे गैरप्रकार करून नोकरी मिळवलेल्या २५७ संशयित उमेदवारांची माहिती समोर आली आहे. यापैकी १७२ जण वेगवेगळ्या बँकांमध्ये नोकरी करत होते. सीबीआय आता देशभरातील इतर बनावट अधिकाऱ्यांचा शोध घेत आहे. आयबीपीएसने या सर्व कार्यरत व्यक्तींसह इतर संशयितांनाही आजीवन परीक्षेसाठी अपात्र ठरवले आहे. संबंधित बँकांना त्यांच्या सेवा नियमांनुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता नोकरी जाण्यासोबतच या व्यक्तींवर अटकेची टांगती तलवारही आहे. सीबीआयने आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे, तर १३५ जणांना आरोपी बनवले आहे. या प्रकरणी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये आरोपींची धरपकड करून कारवाई करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात या प्रकरणी तपासानंतर ग्रामीण बँकेच्या १९ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. असा उजेडात आला गैरप्रकार अधिकाऱ्यांनी ८ ऑक्टोबर रोजी सांगितले की, CBIच्या स्पेशल टास्क ब्रँच, मुंबईने अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS)च्या तक्रारीवरून दाखल करण्यात आलेल्या FIRनंतर ही कारवाई करण्यात आली. IBPSने बँक भरती परीक्षांच्या उमेदवारांच्या छायाचित्रांची आणि बायोमेट्रिक नोंदींची पुन्हा तपासणी केली होती. यात काही उमेदवारांच्या जागी अन्य व्यक्तींनी परीक्षा दिल्याचे समोर आले. छायाचित्र आणि बायोमेट्रिक ओळखीत तफावत आढळल्यानंतर संशयित कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यात आली. आरोपींनी बँक भरती प्रक्रियेतील अनेक टप्प्यांमध्ये उमेदवार बनून परीक्षा आणि मुलाखती दिल्या. पाच वर्षे जुन्या नोंदींमधून बनावटपणा उजेडात या तपासाचे वैशिष्ट्य असे आहे की, केवळ परीक्षेच्या वेळी ओळख तपासण्याऐवजी पाच वर्षांच्या जुन्या नोंदी तपासून बनावटपणा करणारे आणि नोकरीवर असलेल्या उमेदवारांमधील संबंध जोडले गेले. २०२० ते २०२४ या कालावधीतील भरती परीक्षांच्या नोंदी पुन्हा तपासण्यात आल्या. यावेळी परीक्षेच्या वेळी घेतलेल्या उमेदवारांच्या आयरिस स्कॅनचा (डोळ्यांच्या बाहुलीची ओळख) मेळ घालण्यात आला. तपासात काही स्कॅन अटक करण्यात आलेल्या आरोपींशी जुळले, तर नोंदींमध्ये ही ओळख त्या उमेदवारांची होती, ज्यांना बँकेत नोकरी मिळाली होती.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *