नांदेेड(प्रतिनिधी)-सोनखेड बसस्थानकात अवैध वाळू वाहतुक करणारा एक हायवा 45 लाख रुपयांचा 5 ब्रास वाळू 25 हजार रुपयांची भरलेला सोनखेड पोलीसांनी जप्त केला आहे. लोहा तालुक्यातील खडकमांजरी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 74 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 फेबु्रवारी रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास बसस्थानक सोनखेड येथे एक हायवा गाडी त्यांनी थांबवली. त्याला नोंदणी क्रमांकच नव्हता. ही गाडी व्यंकटी आलट (45) रा.हरदस ता.लोहा हा चालवत होता. त्याला वाळूची पावती विचारली तेंव्हा तो देवू शकला नाही. तसेच वाळू वाहतूूक रात्री बंदच आहे. यानुसार सोनखेड पोलीसांनी हायवा आणि वाळू जप्त करून वाहन चालकासह मालकाला आररोपी सदरात नोंद करून गुन्हा क्रमांक 45/2026दाखल केला असून पोलीस अंमलदार हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
खडकमांजरी ता.लोहा येथील माधव उमाजी कापसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 फेबु्रवारी रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिणे आणि रोख रक्कम असा 74 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. लोहा पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 46/2026 दाखल केला असून पोलीस अंमलदार साखरे अधिक तपास करीत आहेत
Post Views: 108
