माता भिमाई आंबेडकर जयंती निमित्त जवळ्यात अभिवादन


भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभाग

नांदेड (प्रतिनिधी)- लोहा तालुक्यातील तसेच नांदेड दक्षिण मतदार संघातील सोनखेड सर्कल अंतर्गत येत असलेल्या, जवळा (दे) या गावांमध्ये विश्वशांती बुद्ध विहार जवळा या ठिकाणी माता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा संरक्षण सचिव आनंद गोडबोले, रमाई जयंती मंडळ अध्यक्षा भारतबाई विठ्ठल निखाते, बौध्दचार्य भा.बो.म.सभा ग्राम शाखा अध्यक्ष सुरेश गोडबोले, भिम जयंती मंडळाचे अध्यक्ष भिमराव गोडबोले, मा.ग्रा.प.सदस्य वसंत गोडबोले, अभियंता वनमाला सुनील वाळवंटे, ग्राम शाखा संस्कार सचिव सुरज कैलास गोडबोले यांच्यासह  भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाने कार्यक्रम घेण्यात आला.

परमपूज्य बोधिसत्व, भारतीय घटनेच्या शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाबाई रामजी आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या अनुषंगाने असे संस्कार आपल्या पाल्यांवर घडविणाऱ्या माता सध्याच्या परिस्थितीमध्ये घडल्या पाहिजे. आणि नवीन येणाऱ्या पिढीमध्ये विद्वान विद्यार्थी ,चिमुकले घडले पाहिजे. असा प्रांजळ उद्देश ठेवून,माता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या १७२ व्या जयंतीनिमित्त धम्मयान या दिनदर्शिकेप्रमाणे साजरी करण्यात आली. विश्वशांती बुद्ध विहार जवळा आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रथम गौतम बुद्ध, माता भिमाई व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पण करून दिपाने व धुपाने पुजा करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक वंदना घेऊन माता भिमाई यांच्या संस्काराची जाणिव करुन दिली. दि.१४ फेब्रुवारी १८५४ रोजी माता भिमाबाई धर्मा पंडित (मुरबाडकर) यांचा जन्म आंबेटेंबे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे झाला होता. त्यांचे वडील धर्मा पंडित (मुरबाडकर) हे मराठा फलटणीत सुभेदार होते. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ (आंबेडकर) यांच्याशी झाला. व त्यांचे १४ वे अपत्य ज्ञानसुर्य, ज्ञानाचे प्रतीक डॉ भिमराव रामजी आंबेडकर होते. याची जाणीव आनंद गोडबोले यांनी लेख वाचन करुन दिली.

यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संरक्षण सचिव तथा आकाशवाणी प्रासंगिक निवेदक आनंद पुरभाजी गोडबोले, भिम जयंती अध्यक्ष भिमराव चांदु गोडबोले, रमाई जयंती मंडळ अध्यक्षा भारतबाई विठ्ठल निखाते, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश गोडबोले,पंकज पुरभाजी गोडबोले, उपासक सुरज कैलास गोडबोले, सुंदराबाई पुरभाजी गोडबोले, सम्राट मिलिंद गोडबोले , साक्षी गोडबोले, अपेक्षा गोडबोले, शाश्वती गच्चे, कावेरी गच्चे, सुरज पंडित,वैभव ननुरे , सचिन झिंझाडे ,विराज हाटकर यांच्या सह भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा, विध्यार्थी भिमजयंती मंडळ, विश्र्वशांती बुद्ध विहार कमिटी, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, माता रमाई जयंती मंडळ , उपासक उपासिका व बालक बालिका यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.

Post Views: 96






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks