![]()
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुणे शहरातील निवडुंग्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महापूजा संपन्न झाली. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा, काकड आरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी पुणे शहरातील महिलांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे स्वतंत्र ‘महिला भवन’ उभारण्याचा संकल्प जाहीर केला. महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत, महिला शेतकरी विधेयक आणि एकल महिला धोरणाची अंमलबजावणी ही महिलांच्या सन्मानाची आणि स्वाभिमानाची नवी दिशा असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून सातत्याने घेतले जाणारे विकासाभिमुख निर्णय अधोरेखित केले. पेपरफुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी लोकसभेत कठोर कायदा करण्याची प्रक्रिया सुरू असून, यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, असा विश्वासही डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला. “मला पाचव्यांदा विधान परिषदेची सदस्य म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी शिवसेना उपमुख्यमंत्री व मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानते,” असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “आज श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेचे भाग्य लाभले. ही पवित्र संधी व शुभार्शिवाद महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला लाभावा आणि राज्यातील शेतकरी, महिला, युवक तसेच सर्व समाजघटकांचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी प्रार्थना मी विठ्ठल चरणी केली.” या सोहळ्याला नगरसेवक विशाल धनवडे, विश्वस्त किशोरजी बाबर, मंदिर समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भजनी मंडळाचे सदस्य आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. हेही वाचा.. …आणिक दर्शन विठोबाचे!: पंढरपुरात पहाटे 3 वा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा; सलग 20 वर्षे वारी करणाऱ्या धाराशिवच्या माने दांपत्याला पूजेचा मान श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस व मानाचे वारकरी दांपत्य यांच्या हस्ते परंपरेनुसार ही पूजा झाली. यंदा मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील गौरगांवच्या बाबासाहेब माने (वय ७०) व प्रभावती माने (वय ६८) या वारकरी दांपत्यास मिळाला. शेतकरी असलेले माने दांपत्य गेल्या २० वर्षांपासून पंढरपूरची वारी करते. सविस्तर वाचा
नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरात महापूजा:आषाढी एकादशीनिमित्त 'महिला भवन' उभारण्याचा संकल्प, सर्वांगीण विकासासाठी प्रार्थना
