भातकुली तालुक्यात २२ हजार २०७ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. दसरा-दिवाळी जवळ आल्याने शेतकरी आता काढणी आणि मळणीच्या कामात गुंतले आहेत. परतीच्या पावसाच्या भीतीमुळे काढणी केलेले पीक सुरक्षित ठेवण्याची चिंता आहे. पावसाने नुकसान टाळण्यासाठी शेतकरी सकाळपासून शेतात दाखल होत आहेत. तालुक्यात कापूस, तूर, उडीद, मका, मुगाचीही पेरणी झाली. टाकरखेडा संभूसह अनेक गावांमध्ये सोयाबीन काढणी वेगाने सुरू आहे, मजुरांकडून किंवा यंत्रांनी कापणी सुरू आहे. ढगाळ वातावरण व विजांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. यंदा अनियमित पावसामुळे सोयाबीन उत्पादनावर असर झाला. उरलेले पीक खराब झाल्यास आर्थिक अडचणी वाढतील. भिजल्यास दर्जा घसरून बाजारभावावर परिणाम होतो. शेतकऱ्यांनी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मागितली आहे.
दसरा-दिवाळीच्या तोंडावर सोयाबीन काढणीला वेग:परतीच्या पावसामुळे पीक सुरक्षित ठेवण्याची शेतकऱ्यांना चिंता