अमरावतीत इंडिया आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. एसआयआर प्रक्रियेतील अनियमितता आणि मतदारांची नावे वगळल्याच्या आरोपांमुळे हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी बॅरिकेड तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. दुपारी साडेबारा वाजता गर्ल्स हायस्कूल चौकातून मोर्चा सुरू झाला. मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि कम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवडणूक आयोगाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले की, निवडणूक आयोगाने यापूर्वी बिहार आणि पश्चिम बंगालमध्येही सत्ताधाऱ्यांना फायदा पोहोचवण्यासाठी अशाच पद्धतीचा वापर केला. अमरावतीतही साडेतीन लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
अमरावतीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयुक्त हटावसाठी मोर्चा:काँग्रेस, राकाँ, कम्युनिस्टांचा सहभाग, आंदोलकांनी बॅरिकेड तोडले