![]()
अजितदादा गेल्यावर शरद पवारांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण सुरू केले. दादांची स्मशानातील राख विजली नव्हती तोच सुनेत्रा पवार यांना शपथ घ्यायला लावली असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हणत तटकरेंवर टीका केली आहे. तटकरे यांनी जे राजकारण केले ते महाराष्ट्रासाठी लाजीरवाणे आहे. रामदास कदम म्हणाले की, सुनेत्रा पवार यांचा शपथविधी 10 दिवसांनंतर घेतली असती तर काय झाले असते? हा माणूस इतका चाणाक्ष आहे त्यांना वाटले की शरद पवार पक्षाचा ताबा घेतील म्हणून त्यांनी शपथविधी करायला लावला, असा दावा कदम यांनी केला आहे. तटकरेंना काहीही करु शकतात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांचा अपघाताबद्दल शंका व्यक्त करत असताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांनीच काही तर केले नाही ना अशी शंका व्यक्त केली होती यावर बोलताना रामदास कदम म्हणाले की, सुनील तटकरे काहीही करू शकतात, ज्या तटकरेंना तिकीट मी मिळवून दिले त्यांच्या तिकीटासाठी मी भांडलो मी त्यांना निवडून आणले त्यांनी लगेच विधानसभेला माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न केला ते सुनील तटकरे काहीही करु शकतात. तटकरे हे भास्कर जाधव यांचा भाऊ आहे असा टोलाही त्यांनी जाधवांना लगावला आहे. भास्कर जाधवांची केली कुत्र्यांशी तुलना रामदास कदम म्हणाले की, भास्कर जाधव यांना गुहागर मतदारसंघात सर्व ठिकाणी पराभव दिसत असल्याने ते कुत्र्यासारखे भुंकत आहेत. अशा भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही. भास्कर जाधवला मी केलेल्या उपकाराची जाण नाही. शिवसेनेमध्ये 1995 मध्ये त्यांना मी तिकीट दिले. शिवसेनेमध्ये सुद्धा मीच आणले पण हा माणूस ज्या ताटात जेवतो तिथेच छेद करतो म्हणत रामदास कदम यांनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधला आहे.
अजितदादा गेल्यावर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केले:राख विजली नसताना सुनेत्रा पवारांना शपथविधी करायला लावला- रामदास कदम
