Sunday, 18 October 2026 | नांदेड आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
ताज्या बातम्या • अचूक माहिती • आपल्या शहराचा आवाज
जाहिरातीसाठी येथे जागा
⌕
ब्रेकिंग न्यूज
म्हैसमाळच्या गिरिजा मातेवरील अथांग श्रद्धा!::अग्रवाल कुटुंबाची भक्ती अन् भाविकांचे श्रद्धास्थान; बन्सीलाल नगरातील मंदिराची खास कहाणी उडत्या विमानाच्या पंखावर उभी राहिली 99 वर्षांच्या आजी:वाहतूक कोंडी टाळत उडत ऑफिसला जातो इसम; जंतरमंतर आंदोलनावर गेम गावंडगाव आणि अडगावात सहा गाढवांचा अचानक मृत्यू:विषारी हरभरे खाऊ घातल्याचा संशय, मालकाने पोलिसांत तक्रार केली; तपास सुरु कुरुक्षेत्र विद्यापीठात स्कॉर्पिओने स्कूटीस्वार तरुणींना उडवले:टोकल्यावर प्राध्यापकाला मारहाण; विद्यार्थी म्हणाले- पोलीस आरोपींचा वाढदिवस साजरा करत आहेत बावनकुळे यांच्या एसआयटीच्या वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार:अमरावतीत हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांचे जोरदार प्रत्युत्तर
Business

राज्यात अनेक भागांतून मान्सूनची माघार:20 जिल्ह्यांत पावसाची तूट, मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी झळ

October 4, 2026 · admin · प्रतिक्रिया नाही




नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्राच्या काही भागांतून माघार घेतली असून, राज्यातील ३६ पैकी २० जिल्ह्यांत पावसाची तूट नोंदवली. मराठवाड्यात पावसाची सर्वाधिक तूट असून, ७० टक्क्यांहून अधिक तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी दिली. राज्यात सर्वाधिक पावसाची तूट सोलापूरमध्ये (५८%) नोंदवली गेली. त्यापाठोपाठ बीड (५१ %), हिंगोली (४९%), जालना (४८%), अहिल्यानगर (४६%) आणि धाराशिव (४५%) यांचा क्रमांक लागतो. कोकणातील सिंधुदुर्ग (३६%), सातारा (२८%) आणि सांगलीतही (२४%) मोठी तूट आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यांत उणे ३४ ते ४९ टक्क्यांच्या दरम्यान तूट आहे. कसा ठरवला जातो मान्सून परतीचा प्रवास जेव्हा एखाद्या भागातून सलग पाच दिवस पाऊस पूर्णपणे थांबतो, वातावरणातील आर्द्रता अचानक घटते आणि जमिनीपासून दीड किलोमीटर उंचीवर वाऱ्याची दिशा बदलून घड्याळाच्या काट्यासारखी होते, तेव्हाच शास्त्रोक्त पद्धतीने मान्सूनची माघार जाहीर केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *