भंडारा जिल्ह्यातील मोहाडी आणि तुमसर तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्यानंतर आज पालकमंत्री पंकज भोयर यांनी या भागाचा पाहणी दौरा केला. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश देणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, या दौऱ्यावर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला नाही, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे हा दौरा नेमका शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला की केवळ हवाई पाहणीपुरताच राहिला, असा सवाल उपस्थित होतोय. भंडारा जिल्ह्यात यंदा अत्यल्प पावसामुळे धान उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. पिकं पिवळी पडली. उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि त्यातच मोहाडी आणि तुमसर तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकज भोयर यांनी आज दुष्काळी भागाची पाहणी केली. पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात येतील, असं पालकमंत्र्यांनी सांगितलं. मात्र, या दौऱ्याला शेतकऱ्यांनीच सवाल केला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पालकमंत्र्यांचा दौरा केवळ हवाई पाहणीपुरता मर्यादित राहिला. पालकमंत्र्यांसोबत फक्त नेते चर्चा करत होते. प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद झाला नाही. दुष्काळाची तीव्रता कागदावरच्या आकडेवारीतून नव्हे, तर शेताच्या बांधावर दिसते. मग बांधावरचा शेतकरीच भेटला नसेल, तर दुष्काळाचं वास्तव प्रशासनापर्यंत पोहोचणार कसं? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. पालकमंत्र्यांनी व्यथा ऐकून न घेतल्याने शेतकऱ्याचे भर चौकात ठिय्या आंदोलन पालकमंत्री पंकज भोयर हे आज भंडारा जिल्ह्याच्या दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आहेत. या दरम्यान तुमसर येथील खापा चौकामध्ये शेतकऱ्यांनी नष्ट झालेल्या धानाची पेंडी घेत पालकमंत्र्यांना व्यथा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पालकमंत्र्यांनी व्यथा ऐकून न घेता भाजप कार्यकर्त्यांची भेट घेत असल्याचा आरोप आता शेतकरी करत आहेत. पालकमंत्र्यांची भेट झाल्याशिवाय रस्ता सोडणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. अखेर पोलिसांनी शेतकऱ्यांना बळजबरीने डिटेन केल्याची माहिती आहे.
पालकमंत्र्यांचा दुष्काळ पाहणी दौरा केवळ दिखावा?:भंडाऱ्यात शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन; पंकज भोयर यांनी शेतकऱ्यांशी संवाद न साधल्याचा आरोप