नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील भाग्यनगर परिसरात जैन मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय शिरसे (वय ३६, रा. गोकुंदा, ता. किनवट) हे नांदेड येथील जैन मंदिराच्या मागे असलेल्या पितृछाया निवास येथे राहतात. दिनांक २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ते २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ते घराबाहेर असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्याने बेडरूममधील रॅकमध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण १,०६,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी स्वाती संजय शिरसे यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६०/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाडेवाले करीत आहेत.

Post Views: 7
