[ads_1]
33 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने चित्रपटसृष्टीतील आपल्या कटू अनुभवांबाबत मोठा खुलासा केला आहे. नयनदीप रक्षितला दिलेल्या मुलाखतीत तापसीने सांगितले की, एकदा चित्रपटाच्या शूटिंगच्या तारखा निश्चित झाल्यानंतरही तिला केवळ चित्रपटाच्या नायकाच्या पत्नीला ती आवडत नसल्यामुळे बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
तापसीच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातून काढून टाकण्याचे कारण तिने विचारले असता निर्मात्यांनी तिला हेच कारण सांगितले. कोणत्याही अभिनेत्याचे किंवा चित्रपटाचे नाव न घेता तिने सांगितले की, कारकिर्दीच्या सुरुवातीला तिला कोणतेही कारण नसताना रिप्लेस केले जाण्याचा सामना करावा लागला होता.

तापसीने हसत हसत नायकाच्या पत्नीचा किस्सा सांगितला.
‘नायकाच्या पत्नीला मी आवडत नव्हते’
संभाषणात तापसीने चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचा प्रसंग सांगितला. तापसी म्हणाली, “मला सांगण्यात आले की चित्रपटाच्या नायकाने मला रिप्लेस केले आहे. यामागचे कारण देवच जाणे. मी कारणांचा अंदाज लावत राहते. कदाचित त्याच्या मनात असुरक्षिततेची भावना असेल किंवा त्याला चित्रपटात आपल्या अधिक जवळच्या व्यक्तीला घ्यायचे असेल.”
मला कोणतेही ठोस कारण सांगण्यात आले नाही. जेव्हा मी वारंवार मला बाहेर का केले याचे कारण विचारत राहिले, तेव्हा मला फक्त एवढेच सांगण्यात आले की नायकाला मला चित्रपटात घ्यायचे नव्हते. तापसीने पुढे सांगितले, “मला रिप्लेस करण्याचे सर्वांत वाईट कारण देण्यात आले ते म्हणजे, ‘नायकाच्या पत्नीला तू आवडत नाहीस.’ आजपर्यंत मला माहीत नाही की तिला मी का आवडत नव्हते.”
दृश्यांचे अति लैंगिकीकरण केले जायचे
तापसीने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात दृश्यांच्या शूटिंगबद्दलही भाष्य केले. त्या म्हणाल्या, “तुम्ही नवीन असता, तेव्हा पडद्यावर एखाद्या दृश्याचे अति-लैंगिकीकरण केले जात आहे, हे तुम्हाला कळत नाही. शूटिंगच्या वेळी हे दृश्य नेमके कोणत्या दिशेने जात आहे, हे समजत नाही. मला वाटायचे की हे दृश्य खूप सौंदर्यपूर्ण असेल; पण पडद्यावर पाहिल्यानंतर जाणवले की याची अजिबात गरज नव्हती.”

त्या म्हणाल्या की आजूबाजूचे लोक हे सामान्य आहे आणि सगळे असेच करत आहेत, असे सांगायचे. त्यामुळे हे कामाचा एक भाग आहे, असे त्यांना वाटायचे. नंतर त्यांच्या लक्षात आले की ग्लॅमरस न दिसताही काम करता येते आणि ग्लॅमर दाखवण्यासाठी अति-लैंगिकीकरणाची गरज नसते.
‘निवडक चित्रपट करण्यावर भर’
यापूर्वी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना तापसीने चित्रपटांची निवड आणि एकाच प्रकारच्या भूमिका मिळण्याबाबत आपले मत मांडले होते. तिने सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमरस आणि गंभीर विषयांवरील चित्रपटांसाठी प्रत्येकी ५-५ अभिनेत्रींचा संच ठरवण्यात आला आहे.
तापसी म्हणाली, “याच कारणामुळे मी चित्रपट नाकारायला सुरुवात केली आहे. मी निर्मात्यांना स्पष्टपणे सांगते की प्रेक्षक चित्रपटाचा शेवट सहज ओळखतील. त्यामुळे मला या चित्रपटात कास्ट करू नका. एकाच प्रकारच्या भूमिकेत अडकून पडू नये म्हणून मी स्वतःच निर्मात्यांना नकार देते.”

दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या ‘चश्मे बद्दूर’ चित्रपटातून तापसीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
‘गांधारी’ चित्रपटात दिसली अभिनेत्री
तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘हसीन दिलरुबा’, ‘शाबाश मिठू’ आणि ‘डंकी’ यांसारख्या चित्रपटांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच ती ‘गांधारी’ या चित्रपटात दिसली आहे.
[ads_2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad