Vikas Gawade Martyred South Sudan UN Peacekeeping Mission Phaltan | संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेवर असताना फलटणचा सुपुत्र शहीद: दक्षिण आफ्रिकेतील दक्षिण सुदानमध्ये विकास गावडे यांना वीरमरण – Kolhapur News



बरड (ता. फलटण) येथील भारतीय सैन्य दलातील जवान विकास विठ्ठल गावडे यास आफ्रिकेतील दक्षिण सुदान या ठिकाणी संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेच्या मोहिमेवर कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले आहे. जवान गावडे यांना वीरमरण आल्याची बातमी समजताच फलटण तालुक्यासह त्यां

.

जवान विकास गावडे हे भारतीय लष्कारातील ११५ – इंजिनीयर रेजिमेंटमध्ये नायक या पदावर सेवा बजावत होते. परदेशातील सैन्यांना मदत करण्यासाठी भारतीय सैन्य दलाची शांतीसेना असलेल्या मोहिमेत ते कार्यरत होते.त्यांची नियुक्ती सध्या आफ्रिकेतील दक्षिण सुदाम या देशात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेसाठी करण्यात आली होती.तिथे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे.

जवान विकास गावडे हे बरड (ता. फलटण ) येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते 22 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलामध्ये रुजू झाले.पुणे येथे त्यांनी सैन्य दलातील अतिशय खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. ते भारतीय सैन्य दलात निष्ठेने सेवा बजावत होते.सध्या ते आफ्रिकेतील दक्षिण सुदाम या देशात संयुक्त राष्ट्राच्या शांती मोहिमेत कार्यरत होते. संयुक्त राष्ट्राच्या “शांति सेनेमध्ये” कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले आहे.

त्यांना वीरमरण आल्याची बातमी कळताच फलटण तालुका व त्यांचे मूळगाव असलेल्या बरड येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई,वडील,एक भाऊ, पत्नी,दोन वर्षांची छोटी मुलगी असा परिवार आहे.त्यांचे पार्थिव उदया रविवारी (ता. 11) रोजी सकाळी त्यांच्या मूळ गावी येणार असून त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *