कला शिक्षकांच्या विरोधानंतर मंडळाचा निर्णय बदलला:रेखाकला परीक्षेची प्रश्नपत्रिका आता हार्ड कॉपीत

[ads1]


शासकीय रेखाकला परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांबाबत महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाने अवघ्या 2 दिवसांत निर्णय बदलला आहे. 22 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी देऊ नये, तर केंद्र संचालक किंवा पर्यवेक्षकांनी प्रश्न फळ्यावर स्पष्ट अक्षरात लिहून द्यावेत, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. या निर्णयाला कला शिक्षकांकडून विरोध झाल्यानंतर मंडळाने 24 सप्टेंबरला सुधारित परिपत्रक जारी केले. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी म्हणजेच झेरॉक्स प्रत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यंदाची शासकीय रेखाकला परीक्षा 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. एलिमेंटरी परीक्षा 28 व 29 सप्टेंबर, तर इंटरमिजिएट परीक्षा 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या अगदी काही दिवस आधी प्रश्नपत्रिकेबाबत निर्णय बदलण्यात आल्याने केंद्रप्रमुखांसमोरील तयारीची जबाबदारी वाढली आहे. केंद्रप्रमुखांच्या लॉगिनवर प्रश्नपत्रिका मंडळाच्या सुधारित सूचनेनुसार संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रप्रमुखांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्रप्रमुखांनी ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून तिच्या आवश्यक प्रती काढून विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहे. त्यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका डाउनलोड करणे, झेरॉक्स काढणे आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवणे, अशी संपूर्ण प्रक्रिया केंद्रांनाच पार पाडावी लागणार आहे. प्रति विद्यार्थी 10 रुपये खर्च सुधारित परिपत्रकात प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्ससाठी प्रति विद्यार्थी 10 रुपये खर्च देय राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा खर्च नेमका कोणाकडून आणि कोणत्या पद्धतीने दिला जाणार, याबाबत केंद्रांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्यातील तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध परीक्षा केंद्रांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देतात. त्यामुळे काही केंद्रांवर मोठ्या प्रमाणात झेरॉक्स काढण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. वीज, इंटरनेटचा अडथळा आल्यास पर्यायी व्यवस्था प्रश्नपत्रिका ऑनलाइन पद्धतीने केंद्रप्रमुखांच्या लॉगिनवर उपलब्ध होणार असल्याने इंटरनेट आणि वीजपुरवठ्याची उपलब्धता महत्त्वाची ठरणार आहे. वीज किंवा इंटरनेटमध्ये अडथळा निर्माण झाल्यास प्रश्नपत्रिका वेळेत डाउनलोड करून प्रती काढण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था ठेवण्याची जबाबदारीही केंद्रप्रमुखांवर सोपविण्यात आली आहे. शिक्षकांचा खर्चाबाबत सवाल पहिल्या परिपत्रकात प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना न देता फळ्यावर प्रश्न लिहिण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घेण्यासाठी आणि तो अचूकपणे उतरवण्यासाठी अतिरिक्त वेळ लागू शकतो, असा आक्षेप कला शिक्षकांकडून घेण्यात आला होता. त्यानंतर मंडळाने सुधारित आदेश काढून हार्ड कॉपी देण्याचा निर्णय घेतला. राज्य कला शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी सांगितले की, पहिल्या परिपत्रकातील सूचनांवर आक्षेप घेतल्यानंतर मंडळाने निर्णय बदलला आहे. मात्र, आता झेरॉक्ससाठी लागणारा खर्च नेमका कोण देणार, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच याबाबत योग्य सूचना आणि व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्याने सुधारित आदेशानुसार प्रश्नपत्रिकांच्या प्रती वेळेत उपलब्ध करून देण्याचे आव्हान केंद्रांसमोर आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका डाउनलोड, झेरॉक्सचा खर्च, तांत्रिक अडचणी आणि पर्यायी व्यवस्था याबाबत मंडळाकडून अधिक स्पष्टता मिळणे आवश्यक असल्याचे कला शिक्षकांचे म्हणणे आहे. हेही वाचा…
आधी SIT चौकशी पूर्ण करा, मगच राज्यसेवा मुख्य परीक्षा घ्या!:विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावू नका; एवढी घाई का? खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 बाबत राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता, गोंधळ आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. औषध निरीक्षक पेपरफुटीच्या ताज्या प्रकरणानंतर निष्पक्ष चौकशीशिवाय कोणतीही परीक्षा होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला असताना चौकशी पूर्ण होण्याआधीच परीक्षेची एवढी घाई का केली जात आहे? असा परखड सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (ट्विटर) पोस्ट करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससी आयोगाचे लक्ष वेधत विद्यार्थ्यांच्या भावना शासनासमोर मांडल्या आहेत. सविस्तर वाचा…

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *