नांदेडमध्ये घरफोडी व बसप्रवासादरम्यान दागिने चोरी; दोन गुन्हे दाखल


नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात घरफोडी आणि बसप्रवासादरम्यान दागिने चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या घटनेत, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सह्याद्री नगर, भगतसिंग चौक येथे ४ जुलै रोजी सायंकाळी ५.३० ते ५ जुलै रोजी रात्री ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ८३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला. याप्रकरणी रहिवासी राधिका किशोर मेडपलवार (वय ५०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 331(4) व 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ./सुमळे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत, रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसी (ता. नायगाव) येथील बसस्थानकावर ४ जुलै रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजता बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या पर्समधील २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. याप्रकरणी आशा रमेश कानगुलवार (वय ४१, रा. सिडको, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ./सोनकांबळे करीत आहेत.दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, घर बंद ठेवताना तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.


Post Views: 316






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *