Mumbai Drug Smuggling Racket Busted; Thane Crime Branch Ganja Seizure Arrest | ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त: ठाणे गुन्हे शाखेने पकडला २ कोटी १४ लाखांचा ६३८ किलो गांजा; ओडिशा – तेलंगणा कनेक्शन उघड – Maharashtra News



ओडिशा आणि तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने उद्ध्वस्त केले आहे. खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचून पोलिसांनी एका इन्होवा कारमधून तब्बल ६३८ किलो गांजा जप्त केला असून, या का

.

मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्ता कक्षाचे पोलीस हवालदार जयकर जाधव यांना एका आलिशान कारमधून मोठ्या प्रमाणात गांजा ठाण्यात येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने खारेगाव टोलनाक्याजवळ सापळा रचला. संशयास्पद इन्होवा कार (क्र. AP-09-BF-9382) येताच पोलिसांनी तिला घेराव घालून झडती घेतली असता, कारमध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा साठवून ठेवल्याचे आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी चिन्ना टागुर लक्ष्मण नायक (वय ३६, रा. मेहबूबनगर, तेलंगणा) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून २ कोटी ४ लाख १६ हजार रुपये किमतीचा ६३८ किलो गांजा आणि १० लाख रुपये किमतीची इन्होवा कार, असा एकूण २ कोटी १४ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला ३ जानेवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही तस्करी ओडिशातून कोणासाठी केली जात होती आणि याचे धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा अधिक तपास मालमत्ता कक्ष करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *