Rahul Narwekar Defends Family Tickets BMC Policy | भाजपच्या ‘नो रिलेटिव्ह’ धोरणाला राहुल नार्वेकर कुटुंब अपवाद: एकाच घरात तिघांना उमेदवारी; विधानसभा अध्यक्षांनी दिले स्पष्टीकरण – Mumbai News



मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पारदर्शकता आणि सामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी भाजपने ‘आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट नाही’ असे कडक धोरण जाहीर केले होते. मात्र, दक्षिण मुंबईच्या राजकारणात हे धोरण शिथिल झाल्याचे दिसत आहे. भाजपचे कद्दावर ने

.

आपल्या कुटुंबाला मिळालेल्या उमेदवारीवर टीका करणाऱ्यांना राहुल नार्वेकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, ते कोणीही पॅराशूट उमेदवार नाहीत. त्यांनी गेल्या १०-१५ वर्षांपासून जमिनीवर राहून लोकांसाठी काम केले आहे. लोकांचा त्यांच्या कामावर विश्वास आहे आणि मतदारांनी त्यांना स्वीकारले आहे. केवळ नातेवाईक आहेत म्हणून नव्हे, तर त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे.”

नार्वेकर कुटुंबातील ‘हे’ सदस्य रिंगणात

राहुल नार्वेकर यांचे बंधून मकरंद नार्वेकर यांना भाजपने प्रभाग क्रमांक २२६ मधून पुन्हा संधी दिली आहे. मकरंद नार्वेकर यांच्या पत्नी हर्षिता यांना प्रभाग क्रमांक २२७ मधून रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर, राहुल नार्वेकर यांच्या चुलत भगिनी गौरवी यांना प्रभाग क्रमांक २२५ मधून भाजपने उमेदवारी दिली आहे. स्वतः राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघाचे आमदार असून सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. अशा स्थित्तीत एकाच कुटुंबात चार पदे गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीतच तिन्ही उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज दाखल केला.

भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?

नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या मुलांचे अर्ज पक्षाने मागे घ्यायला लावले, तर कोल्हापुरात खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलालाही संधी नाकारण्यात आली. मात्र, मुंबईत नार्वेकर कुटुंबासाठी हा नियम शिथिल केल्याने “पक्ष एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का लावत आहे?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

भाजपमध्ये तिकीट वाटपावरून उमेदवारांची नाराजी

दरम्यान, मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होईल. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख होती. सत्ताधारी महायुतीत विशेषतः भाजपमध्ये तिकीट वाटपाच्या मुद्यावरून संतापाच्या लाटा उसळत आहेत. उमेदवार यादीत आपले नाव नसल्याचे पाहताच या इच्छुकांनी भाजपच्या नेत्यांवर तोंडसूख घेतले. यावेळी त्यांची रडारडही सुरू होती. यात काही महिला इच्छुकांचाही समावेश होता.

नाशिक भाजपमध्येही प्रचंड नाराजी समोर आली आहे. तिकीट नाकारल्याने अनेक इच्छुक नाराज झालेत. त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तर ‘एबी’ फॉर्मसाठी काही इच्छुकांनी शहराध्यक्षांचा पाठलाग केला. निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप होतोय. नाशिक-मुंबई महामार्गावर शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा इच्छुकांनी पाठलाग केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *