सिडकोतील डोरोमॉन् हत्या;सहा जणांवर गुन्हा दाखल 

[ads1]

नवीन नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहू नगर, वाघाळा येथे एका २० वर्षीय तरुणाची किरकोळ वादातून धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. संघरत्न उर्फ डोरोमॉन् माधव वाघमारे (वय २० वर्ष, रा. शाहू नगर, वाघाळा, नांदेड) असे मृत तरुणाचे नाव आहे.संघरत्न उर्फ डोरोमॉन् माधव वाघमारे यांचे नाव सुद्धा गुन्हेगारी पार्श्ववभूमीत नामांकित होते. १८ वर्ष अर्थात वयस्क या संज्ञेत येण्या अगोदर सुद्धा त्याने बरेच गुन्हे केले होते असे सांगण्यात आले.

घटनाक्रम आणि पार्श्वभूमी

पोलीस अहवालानुसार, ही घटना १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास शाहू नगर येथील फिल्टर पाण्याच्या टाकीजवळ घडली. मृत संघरत्न याचा आरोपींसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून ६ जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून धारदार हत्याराने संघरत्न याच्या चेहऱ्यावर, मानेवर, डोक्यावर आणि छातीवर वार करून त्याला ठार मारले.

या प्रकरणी मृत तरुणाची आई पंचशिला माधव वाघमारे (वय ३९ वर्ष, व्यवसाय: घरकाम व टेलरिंग, रा. बळीरामपूर, ह.मु. शाहू नगर, वाघाळा) यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डॉरेमोनला मारून टाकणाऱ्या ६ आरोपींची नावे

या हत्याप्रकरणी खालील ६ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

  • राजदिप उर्फ माँटी दिपक तारु 
  • प्रविण उर्फ बबलु रावसाहेब तारु
  • आदर्श उर्फ अनिल संजय लोहकरे
  • साईनाथ उर्फ साई राजु धुमाळे
  • आदेश उर्फ बंटी संजय कांबळे
  • माधव आनंदा नवघरे (सर्व रा. शाहू नगर, हाडको, नांदेड)

पोलीस कारवाई व तपास

या घटनेप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. १२२४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १८९(२), १८९(३), १९१(३) सह शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश नाईक आणि सपोनि रेखा काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मंगेश नरसिंग नाईक करत असून, सध्या परिसरात शांतता आहे.

संघरत्न उर्फ डोरोमॉन् माधव वाघमारे









[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *