![]()
मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई ग्रामपंचायतीमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत राज अभियान’ अंतर्गत ५० टक्के करसवलत मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे थकीत मालमत्ता करात सवलत मिळत असून, ग्रामस्थांकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
.
या अभियानांतर्गत ग्रामस्थांना “आपले घर, आपला परिसर आणि आपले गाव स्वच्छ ठेवणे हीच खरी सेवा” असा स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. थकीत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जात आहे. ग्रामपंचायत अधिकारी विनोद मनवर, सरपंच, उपसरपंच आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीपणे राबवली जात आहे.
या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत अधिकारी विनोद मनवर यांच्यासह रवींद्र पवार, सचिन बरडे, अमोल पोटे, प्रवीण वानखडे आणि ज्योती लंगडे हे कर्मचारी सक्रियपणे कार्यरत आहेत. थकबाकी भरून करमुक्त होणाऱ्या नागरिकांचा पुष्पहार घालून सत्कार केला जात आहे.
या शिबिरांमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी, संगणक परिचालक, रोजगार सेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
