Divya Marathi Editor Deepti Raut Wins The Statesman Award 2026

[ads1]

दैनिक भास्कर समूहाच्या ‘दिव्य मराठी’ या मराठी वृत्तपत्राच्या संपादिका दीप्ती राऊत यांना प्रतिष्ठित ‘द स्टेट्समन अवॉर्ड्स फॉर रुरल रिपोर्टिंग 2025’ मध्ये पत्रकारितेतील प्रथम पारितोषिक मिळाले आहे. नाबार्डचे अध्यक्ष पुरुषोत्तम कुमार भारद्वाज यांनी कोलका

.

या श्रेणीत भास्करच्या पत्रकाराला प्रथम पारितोषिक मिळण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी राजस्थानचे विजयपाल डुडी यांना हा पुरस्कार मिळाला होता.

बाण, बांबू अन् ब्लेडने प्रसूती बातमी

नाशिक आवृत्तीच्या संपादक दीप्ती राऊत यांनी आपल्या वृत्तातून खुलासा केला होता की, जननी सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना असतानाही महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये बाण, बांबू आणि ब्लेडच्या साहाय्याने प्रसूती केली जात आहे.

या वृत्ताची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून पुढाकार घेत जनहित याचिका दाखल केली होती. तसेच, आरोग्यमंत्र्यांनीही चौकशीचे आदेश दिले होते.

दिव्य मराठीमध्ये प्रकाशित झालेले वृत्त

ज्या बातमीसाठी पुरस्कार मिळाला, त्या बातमीची लिंक खाली दिली आहे.

दिव्य मराठी एक्स्पोज:बाण, बांबू अन् ब्लेडने बाळंतपण; सुरक्षित मातृत्व वाऱ्यावर, नंदुरबारमध्ये पुरुष दायांच्या भरवशावर आजही हाेताहेत प्रसूती

राज्यातील माता मृत्यू, अर्भक मृत्यू, नवजात मृत्यू कमी व्हावेत म्हणून महाराष्ट्र शासनाने गेल्या दीड वर्षात ७७१ कोटींचा निधी खर्च केला. मात्र दुर्गम भागात ना योजना पोहोचल्या ना शासनाची आरोग्य यंत्रणा. त्यामुळे आजही बांबूच्या काड्या, बाणाची पाती आणि दाढीच्या ब्लेडने प्रसूती केल्या जात असल्याचा हा धक्कादायक रिपोर्ट. कहर म्हणजे वेदना कमी करण्यासाठी येथे बाळंतिणीला मोहाची दारू पाजली जाते. यामध्ये किती बाळं दगावली जातात आणि किती मातांचे मृत्यू लपवले जातात याची नोंदच होत नसल्याचं भीषण वास्तव चिमलखेडेचे नुरजी वसावे यांनी मांडलं. ६ कोटी खर्च करून बांधलेल्या जांगठी पीएचसीपासून अवघ्या ७ किलोमीटरवरील ही परिस्थिती. वाचा सविस्तर बातमी…

अर्ध्या तासाच्या कळा आल्या आणि मेलेलं बाळ बाहेर आलं. घरातल्या ब्लेडनं मीच माझी नाळ कापली. धडगाव तालुक्यातल्या भाबरी गावच्या गिरू किल्ला पावरा या ४० वर्षांच्या महिलेचं हे आठवं बाळंतपण.

अर्ध्या तासाच्या कळा आल्या आणि मेलेलं बाळ बाहेर आलं. घरातल्या ब्लेडनं मीच माझी नाळ कापली. धडगाव तालुक्यातल्या भाबरी गावच्या गिरू किल्ला पावरा या ४० वर्षांच्या महिलेचं हे आठवं बाळंतपण.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *