Divorced Woman Assaulted in Sengaon Hingoli Case Filed Against Nanded Youth Photos VIDEOS | घटस्फोटीत महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन अत्याचार: नांदेडच्या एका तरुणावर सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना – Hingoli News



सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात घटस्फोटीत महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत लग्नाचे अमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २४ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील राजेश बाबुराव वाघमारे उर्फ मोरे हा सुमारे दिड वर्षापुर्वीपासून सेनगाव तालुक्यात एका फायनांन्स कंपनीमध्ये काम करीत होता. यावेळी वसूली व इतर कारणावरून त्याचे बाहेरगावी दौरे होत होते. यामध्ये त्यांचे एका घटस्फोटीत महिलेसोबत सुत जुळविले. त्याने महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत तिच्याशी वारंवार संवाद साधण्यास सुरवात केली.

त्यानंतर त्याने महिलेस लग्नाचे अमिष दाखविले. तु्झ्या सोबत लग्न करतो तसेच तुझ्या मुलाचा सांभाळ करतो असे म्हणत ता. १३ जानेवारी २५ ते ता. १९ सप्टेंबर पर्यंत तिला सेनगाव, नांदेड, वाशीम येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मागील काही दिवसांपासून त्या महिलेने लग्न करण्याचा तगादा लावल्यानंतर त्याने महिलेस टाळण्यास सुरवात केली तसेच महिलेस जिवे मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी त्या महिलेने सेनगाव पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी राजेश वाघमारे उर्फ मोरे याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक मस्के, उपनिरीक्षक रवीकिरण खंदारे, जमादार सुभाष जाधव यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. उपनिरीक्षक खंदारे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *