Paush Month Auspicious Marriage Talks Donation Shivling Ghee Abhishek | पौष महिना अशुभ हा चुकीचा समज: विवाहाच्या बोलणीसाठी उत्तम योग‎, शिवलिंगावर तुपाचा अभिषेक ठरेल फलदायी, दानधर्माचे विशेष महत्त्व‎


प्रतिनिधी | छत्रपती संभाजीनगर‎11 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पौष महिना म्हणजे भाकड मास या‎जुन्या समजुतीमुळे अनेकदा शुभ‎कार्ये आणि महत्त्वाची बोलणी पुढे ‎‎ढकलली जातात. मात्र, हा समज‎पूर्णतः चुकीचा असून धर्मशास्त्र‎आणि ज्योतिषशास्त्रानुसार पौष‎महिना हा उपासना, दानधर्म आणि ‎‎आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वाचा‎आहे. सूर्य धनु राशीत असेपर्यंत‎विवाहाचे मुहूर्त नसले, तरी या‎काळात विवाहाची बोलणी करण्यास ‎‎हरकत नाही. उलट शिवलिंगावर‎तुपाचा अभिषेक, शाकंभरी ‎‎नवरात्रोत्सवामुळे या महिन्याला‎विशेष आध्यात्मिक वलय प्राप्त झाले ‎‎आहे. गैरसमज दूर करत धर्मशास्त्राचा ‎‎खरा आधार घेण्याचे आवाहन‎धर्मशास्त्र अभ्यासकांनी केले आहे.‎

‘रुढी बलियेसी’चा चुकीचा अर्थ‎: पौष महिन्यात शुभकार्य‎ टाळण्यामागे ‘रुढी बलियेसी’ या‎वचनाचा दाखला दिला जातो. मात्र ‎‎धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते,‎शास्त्रातून निर्माण झालेली रुढीच ‎मान्य आहे.‎

पौष महिन्याविषयी असलेले गैरसमज दूर करा‎

पौष महिन्यात थंडीमुळे आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पूर्वी लोक‎महत्त्वाची कामे टाळत असत. कालांतराने याच कारणावरून पौष महिना‎अशुभ असल्याची धारणा तयार झाली. मात्र याला धर्मशास्त्रीय किंवा‎ज्योतिषीय आधार नसल्याचे पांडव यांनी सांगितले.‎

दिव्य मराठी नॉलेज: या गोष्टी करणे ठरेल शुभ‎ १. पौष पौर्णिमेपासून पौर्णिमान्त माघ सुरू‎होतो. या दिवसापासून माघस्नानाला‎प्रारंभ करावा.‎ २. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा‎शाकंभरी देवीचा महोत्सव शारदीय‎नवरात्रोत्सवासारखा असतो.‎ ३. पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल‎तर शिवप्रीत्यर्थ स्नान, जप, होम तर्पण व‎ब्राह्मण भोजन करावे.‎ ४. पौष अमावास्येला अधोंदय पर्व आले‎असता स्नानदानादी धर्मकृत्यं करावीत.‎ ५. शिवलिंगावर महिनाभर तुपाचा‎अभिषेक करावा. दीपाराधना करावी.‎ ६. पौषाच्या दोन्ही पक्षांतील नवमीला‎उपवास करून दुर्गेची त्रिकाळ पूजा‎करावी.‎ ७. दुर्गेची मूर्ती पिठाची करावी. व्रतानिमित्त‎आठ कुमारिकांना भोजन घालावं.‎ ८. महिनाभर एकवेळ उपवास करून जे‎शक्य असेल ते दान करावं.‎

लग्नाची बोलणी करा- अनंत पांडव गुरुजी, धर्मशास्त्र ‎अभ्यासक‎ अर्धा मास सूर्य मकर राशीमध्ये‎असतो. मकर संक्रांती उत्सव‎साधारण जानेवारी १४ तारखेला‎येतो. मकर संक्रांतीच्या काळात‎अयन बदलतो. सूर्याचा मकर राशीत‎प्रवेश करणारा सूर्याचा रथ‎घोड्याऐवजी गाढवामध्ये बदलतो.‎ह्या गाढवाला खर संबोधले आहे.‎म्हणून या महिन्याला खरमास‎देखील म्हणतात. त्यासाठी विवाह‎निषिद्ध मानतात, परंतु विवाहाची‎ बोलणी करता येते.‎

विवाह व गृहप्रवेशाबाबत‎त ज्ज्ञांकडून स्पष्टता‎

या महिन्यात विवाह निषिद्ध नाही.‎फक्त सूर्य धनु राशीत असताना‎विवाह मुहूर्त टाळावेत, असे शास्त्र‎सांगते. उर्वरित काळात योग्य‎ग्रह-नक्षत्र असल्यास विवाह करता‎येतो. विशेष म्हणजे श्री खंडोबा‎आणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाह‎पौष महिन्यातच शुक्ल त्रयोदशीला‎पाली येथे होता, असा उल्लेख‎परंपरेत आढळतो. गृहप्रवेश,‎वास्तुशांती करू नये. केवळ नवीन‎घराचे मुख्य बांधकाम सुरू करता‎ येते.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *