Political contradictions in 5 municipalities of Amravati | अमरावतीच्या 5 नगरपालिकांमध्ये राजकीय विरोधाभास: नगराध्यक्ष एका पक्षाचा, नगरसेवक दुसऱ्याचे; विकास कामांची वाट खडतर – Amravati News



अमरावती जिल्ह्यातील पाच नगरपालिकांमध्ये राजकीय विरोधाभास निर्माण झाला आहे. नगराध्यक्ष एका पक्षाचा, तर नगरसेवकांचे बहुमत दुसऱ्या पक्षाचे अशी स्थिती असल्याने आगामी काळात विकासकामांचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी होणाऱ्या प

.

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, अचलपूर, मोर्शी, चांदूर रेल्वे आणि धारणी या पाच नगरपालिकांमध्ये ही परिस्थिती आहे. नगराध्यक्षपदावर एका पक्षाचा उमेदवार विजयी झाला असला तरी, त्या पक्षाला नगरसेवकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. यामुळे उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकणे संबंधित पक्षांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये सहा ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद पटकावले, तर काँग्रेसला दोन, शिवसेना (शिंदे गट), वंचित बहुजन आघाडी, प्रहार आणि शिवसेना (उबाठा) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. भाजपने जिंकलेल्या सहा जागांपैकी अचलपूर, अंजनगाव सुर्जी आणि धारणी येथे त्यांना नगरसेवकांमध्ये बहुमत मिळालेले नाही.

सर्वात मोठ्या ४१ सदस्यीय अचलपूर नगरपालिकेत भाजपला केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. २८ सदस्यीय अंजनगाव सुर्जीमध्ये ६, तर १७ सदस्यीय धारणीमध्ये केवळ ४ जागा जिंकता आल्या. यामुळे या तीनही ठिकाणी भाजपला स्वतःचा उपाध्यक्ष निवडून आणणे कठीण होणार आहे.

चांदूर रेल्वे नगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्षपद जिंकले असले तरी, २० पैकी केवळ दोनच नगरसेवक त्यांच्या पक्षाचे आहेत. येथे भाजपने ११ जागा जिंकल्याने वंचित बहुजन आघाडीला भाजपशी राजकीय सामना करावा लागेल. मोर्शी नगरपालिकेतही अशीच स्थिती आहे. शिवसेनेने (शिंदे गट) नगराध्यक्षपद जिंकले, परंतु २४ सदस्यीय सभागृहात त्यांना फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनी प्रत्येकी ६ जागा जिंकल्या आहेत, तर प्रहार आणि रोडे गटाने प्रत्येकी एक जागा मिळवली आहे. त्यामुळे येथेही राजकीय संघर्ष अटळ मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *