Dhule’s Hrithik defeated Meerut’s Shakir, wrestling riots took place on the occasion of Devmamaledar Shri Yashwantrao Maharaj Yatra | धुळ्याच्या ऋतिकने मेरठच्या शाकीरला चारली धूळ: देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रेनिमित्त रंगली कुस्त्यांची दंगल‎ – Nashik News



देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज यात्रोत्सवानिमित्त आयोजित कुस्ती दंगलीत मानाच्या कुस्तीचा सामना धुळ्याचा हरहर महादेव तालीम संघाचा पहेलवान ऋतिक राजपूत व मेरठ दिल्ली येथील शाकीर नुर यांच्यात झाली. यात धुळ्याच्या ऋतिक राजपुतने एक चाक डावात दिल्लीच्या श

.

शनिवारी (दि. २०) आरम नदीपात्रात आयोजित कुस्ती दंगलीचा शुभारंभ पोलिस निरीक्षक योगेश पाटील, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड विश्वस्त, यशवंत तालीम संघाचे अध्यक्ष अनिल पाकळे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. दंगलीसाठी नामवंत पहेलवान आले होते. कुस्ती पहाण्यासाठी हजारो शौकिनांनी हजेरी लावली होती. यावेळी सुनील महाजन, देवमामलेदार देवस्थान यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ याच्या स्मृतीपित्यर्थ चांदीची गदा तर आमदार दिलीप बोरसे यांच्यातर्फे ११ हजार रुपये देण्यात आले.

आरम नदीपात्रात झालेल्या कुस्ती दंगलीसाठी लाईटची व्यवस्था नसल्याने वेळेअभावी काही कुस्त्या होऊ शकल्या नाहीत. तर शेवटची कुस्ती अंधारातच पार पडली. विलेअभावी काही कुस्त्या कमी झाल्याने बक्षीसासाठी आणलेले अनेक भांडे परत करण्यात आल्याचे समालोचक गुलाब सुर्यवंशी यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *