Police shoot at goon at Avalwadi Phata | Pune crime News | आवळवाडी फाटा येथे पोलिसांचा गुंडावर गोळीबार: चंदननगर गुन्ह्यातील आरोपीला पकडताना स्वसंरक्षणार्थ कारवाई – Pune News



पुण्यातील आवळवाडी फाटा परिसरात शनिवारी रात्री पोलिस आणि एका गुंडात थरारक प्रसंग घडला. चंदननगर पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात पाहिजे असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर गुंडाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ

.

मिळालेल्या माहितीनुसार, चंदननगर पोलिस स्टेशनमधील गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी ओंकार दिलीप भंडारे (वय २०, रा. चंदननगर, पुणे) याला अटक करण्यासाठी शनिवारी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र डावरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश जगदाळे आणि तीन अंमलदार आवळवाडी चंदननगर रोड, खराडी येथील झाडाझुडपांमध्ये गेले होते.

आरोपी भंडारे याने पोलिसांना पाहताच त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून पोलिसांवर गोळीबार केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, उपनिरीक्षक डावरे यांनी प्रत्युत्तर म्हणून आणि स्वसंरक्षणार्थ त्यांच्या सरकारी पिस्तुलातून गोळी झाडली. ही गोळी आरोपी भंडारे याच्या डाव्या मांडीला लागली आणि तो जखमी झाला.

जखमी आरोपी ओंकार भंडारे याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात कोणताही पोलिस कर्मचारी किंवा अधिकारी जखमी झालेला नाही. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

पोलिस उपायुक्त सोमय्या मुंडे यांनी सांगितले की, चंदनगर पोलिसांच्या तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक डावरे यांनी आपल्या स्वसंरक्षणार्थ रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या पायावर गोळी झाडली आहे. ओंकार दिलीप भंडारे (वय 20) असे रेकॉर्डवरील आरोपीचे नाव आहे. वाहन तोडफोडीतील सदर आरोपी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *