Disgruntled BJP leaders hint at a third development front, will the headache increase or will the storm in the sky subside? | भाजपतील नाराज नेत्यांकडून तिसऱ्या विकास आघाडीचे संकेत: डोकेदुखी वाढणार, की पेल्यातील वादळ शमणार‎ – Akola News



महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागले असतानाच, निवडणुकीच्या निमित्ताने भाजपतील नाराजांनी वेगळी मोट बांधून उभारलेला नागरिक मंच अकोल्याच्या राजकारणाला नवी दिशा द

.

शिस्तभंगाची कारवाई झालेल्या माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी, भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते डॉ. अशोक आेळंबे या शहरातील दोन मातब्बर नेत्यांसह पक्षातील नाराज आजी- माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘नागरिक संवाद मंच’च्या बैठकीत भाजपतील नाराजांनी वेगळी मोट बांधली आणि महापालिकेत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याचे संकेत दिले आहेत. यानंतर भाजपने शिस्तभंगाची कारवाई केलेल्या नेत्यांसह पक्षाच्या नाराज गटावर टीकेची झोड उठवली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते व तब्बल ३० वर्षे नगरसेवक राहिलेले हरीश अलीमचंदानी यांनी पक्षाला रामराम ठोकत निवडणूक लढवली. तसेच भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक ओळंबे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक लढवली. या दोन्ही बंडखोर उमेदवारांमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले आणि त्याचा थेट फटका भाजपला बसला. अखेर भाजपला या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला होता. या दोघांचे संबंधित प्रभागातील वर्चस्व पाहता जर हे सर्व नाराज नेते आणि कार्यकर्ते प्रत्यक्षात एकत्र आले, तर भाजपची डोकेदुखी निश्चितच वाढणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात पक्षातून बाहेर पडलेल्या नेत्यांची घरवापसी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अकोल्यात हा घरवापसीचा पॅटर्न अपयशी ठरताना दिसत आहे. उलट, हा अपवादच पक्षासाठी डोकेदुखी ठरू पाहत आहे. नवे राजकीय समीकरणासाठी नाराजांनी शहरातील बंधन लॉनवर मंगळवारी सायंकाळी नागरिक संवाद घेऊन तिसऱ्या आघाडीची मोट बांधली. यावेळी हरीश अलीमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे, माजी नगरसेवक गिरीश गोखले, आशिष पवित्रकार, हरिभाऊ काळे, चोटमल सारडा, पांडुरंग काळणे, विठ्ठलराव गाढे, मधुकर रगडे आणि प्रा. गणेश बोरकर आदी उपस्थित होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या अकोला पश्चिम मतदारसंघातील पराभवानंतर भाजपने पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत अनेक आजी- माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. शिस्तभंग कारवाईनंतर त्यांनी ‘नागरिक संवाद मंच’ची स्थापना केली. या संवादातून अप्रत्यक्षपणे भाजपला थेट आव्हान देण्यात आल्याचे चित्र आहे. कारण या नाराज गटाकडे हिंदुत्ववादी एकगठ्ठा मते आहेत. त्याचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसू शकतो. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात झालेली चूक पुन्हा होऊ नये, या दृष्टीने भाजपचे वरिष्ठ नेते भाजपमधील नाराज बंडोबांना थंड करण्यासाठी कोणते तंत्र वापरतात, याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभेची चूक टाळण्यासाठी भाजपचे प्रयत्न?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *