NCP MLA Conviction Court Verdict Maharashtra Politics | अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ: आणखी एक आमदार आढळला दोषी, राजू कारेमोरेंना पोलिसांना शिवीगाळ भोवली – Nagpur News



उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नाशिकचे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली असतानाच, आता भंडाऱ्याचे आमदार राजू क

.

भंडाऱ्याच्या तुमसर-मोहाडी विधानसभेचे आमदार राजू कारेमोरे यांना पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी आज भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. द्वितीय श्रेणी तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी हा निकाल दिला. न्यायालयाने कारेमोरे यांना कलम 143, 294 आणि 504 अन्वये दोषी धरले, तर कलम 353 मधून त्यांची निर्दोष मुक्तता केली.

तथापि, आमदार कारेमोरे आणि त्यांचे चार सहकारी हे लोकप्रतिनिधी असून त्यांची समाजात चांगली वागणूक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे त्यांना थेट शिक्षा न सुनावता, “पुढील दोन वर्षे कुणाशीही वाद न घालता लोकप्रतिनिधीला साजेसे वर्तन ठेवावे,” अशी तंबी देत न्यायालयाने त्यांची ‘बंद पत्रावर’ सुटका केली.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण 31 डिसेंबर 2021 रोजीचे आहे. आमदार कारेमोरे यांचे मित्र यासीन छवारे आणि अन्य सहकारी वरठी येथून तुमसरकडे जात होते. त्यावेळी मोहाडी-तुमसर मार्गावर नगरपंचायत निवडणुकीच्या स्ट्रॉंग रूमबाहेर काही पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी पोलिसांनी 50 लाख रुपये लुटल्याचा आणि मारहाण केल्याचा आरोप कारेमोरे यांनी केला होता.

या घटनेनंतर संतापलेल्या राजू कारेमोरे यांनी मोहाडी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना अश्लील शिवीगाळ केली होती. याप्रकरणी 3 जानेवारी 2022 रोजी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. याच खटल्याचा निकाल आज लागला.

कोकाटेंवर टांगती तलवार

एकीकडे कारेमोरे यांना दिलासा मिळाला असला तरी, दुसरीकडे सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कायम आहेत. एका जुन्या प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. नियमानुसार दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास लोकप्रतिनिधींचे पद रद्द होऊ शकते. त्यामुळे कोकाटेंच्या आमदारकीवर टांगती तलवार असतानाच, आता दुसऱ्या आमदारालाही न्यायालयाने दोषी ठरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *