[ads1]
![]()
सण-उत्सव हे सामाजिक एकोपा आणि बंधुभाव वाढविण्याचे माध्यम असून, सर्व धर्मियांनी परस्पर समन्वयातून एकमेकांच्या श्रद्धा व परंपरांचा आदर जोपासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. धोंडोपंत स्वामी यांनी केले.
.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस दल व सटाणा पोलिस ठाण्याच्या वतीने राधाई मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात ते बोलत होते.
मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश माणगावकर यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधला. प्रत्येक गणेश मंडळाने धर्मादाय विभागाकडे आवश्यक नोंदणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण, मिरवणूक, वाहतूक आणि कायदा – सुव्यवस्थेबाबत विविध सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांनी केले. यावेळी प्रांताधिकारी महेश शेलार, गटविकास अधिकारी अतुल पाटील, मुख्याधिकारी ज्योती भगत, महावितरणचे अभियंता पी. डी. मोरे, रवींद्र नागदेवे, पोलिस उपनिरीक्षक अतुल बोरसे, सहाय्यक निरीक्षक सुनील वसावे, शिवसेना जिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे आदींसह गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना पारितोषिक गणेशोत्सवात सामाजिक, पर्यावरणपूरक व उल्लेखनीय उपक्रम राबविणाऱ्या गणेश मंडळांचे पोलिस विभागाकडून परीक्षण करण्यात येणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहितीही राकेश माणगावकर यांनी दिली.
[ads2]
















Leave a Reply