विनायक राऊत शिंदे सेनेकडून दर महिन्याला रिचार्ज घेतात!:ते शिंदे सेनेचे हेर, त्यांनी मातोश्रीशी गद्दारी केली- बाळ माने, फडणवीसांचेही केले कौतुक
![]()
विनायक राऊत हे शिंदे सेनेच्या काही नेत्यांकडून दर महिन्याला रिचार्ज घेतात असा आरोप बाळ माने यांनी केला आहे. शिवसेनेचे अनेक नेते हेच बोलत आहेत. पक्षाच्या पदाधिकारी निवडीसाठी सुद्धा विनायक राऊत पैसे घेतात, त्यांनी मी विधान परिषद निवडणुकीत पैसे घेऊन माघार घेतली असे म्हणू नये, असा टोला बाळ माने यांनी लगावला आहे. ते नारायण राणेंची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विनायक राऊतांवर टीका केली आहे. बाळ माने म्हणाले की, विनायक राऊत यांनी संघटना वाढवावी. मी पैसे घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला हे जर त्यांनी सिद्ध केले तर मी राजकारण सोडून देईल. कोकणातील संपूर्ण संघटना विनायक राऊत यांनी संपवली आहे. उद्धव ठाकरे हे अतिशय चांगले नेते आहेत. संजय राऊत जबाबदार नेते आहेत, त्यांना मी काय आहे माहिती आहे. विनायक राऊत यांनी शिंदे सेनेची सुपारी घेतली आहे. त्यांना कोण रिचार्ज देते सर्वांना माहिती आहे. विनायक राऊत मातोश्रीसोबत गद्दारी करत आहेत. ते शिंदे सेनेचे हेर आहेत. उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचे आहे त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. राऊतांनी आत्मपरीक्षण केले बाळ माने म्हणाले की, मी उमेदवारी का मागे घेतली याबद्दल मला काही विचारणा झाली नाही. गेली 40 वर्षे सामाजिक काम करतो आहे, पक्षाचा उपनेता म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती, माजी आमदार आहे, संजय राऊत यांनी माझी पक्षातून हकालपट्टी केल्याचे मला माध्यमांमधून कळाले. त्यानंतर विनायक राऊत यांनी माझ्यावर आर्थिक लाभामुळे उमेदवारी मागे घेतल्याचा आरोप केला. विनायक राऊत यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. विनायक राऊतांनी कोणाची सुपारी घेतली? बाळ माने म्हणाले की, रत्नागिरी लोकसभेची जागा जिंकण्याकरता विनायक राऊत पालघरच्या हॉटेलमध्ये काय करत होते? त्या ठिकाणी पैसे घेऊन तुम्ही उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि खासदार पडला. माझ्या निवडणुकीच्या वेळीसुद्धा तुम्ही कोणाची सुपारी घेतली होती? कोण महिला कलाकार मागच्या दाराने येत होत्या? बाळ मानेला उमेदवारी देऊ नका असे कोणत्या महिला कलाकाराने सांगितले? माझी एवढी भीती कशाकरता होती? रत्नागिरीमध्ये तेव्हा सर्व पदाधिकारी विनायक राऊत यांचे होते त्यांनी पैसे घेऊन मला मतदान केले नाही. हे सर्वांना माहिती आहे, की हे विनायक राऊत यांच्या परवानगीनेच झाले. शेतकरी कामगार पक्षाने अर्ज का दाखल केला बाळ माने म्हणाले की, माझी उमेदवारी ही मविआतील सर्व पक्षांसोबत चर्चेनंतर जाहीर झाली होती. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाने अर्जच भरायला नको होता पण हे सर्व विनायक राऊत यांनी घडवून आणले. कारण त्यांना जुने संबंध जपायचे होते. विनायक राऊतांनी संघटना वाढवण्याचे काम करावे. आम्ही घोडेबाजार रोखला बाळ माने म्हणाले की, मी उमेदवारी का मागे घेतली आहे याचे कारण मी काल सांगितले. कारण माझ्या पक्षाचे 55 मतेच मला मिळाली असती आणि मविआतील इतर पक्षांचे मला मतदान झाले नसते तर खूप बेइज्जती झाली असती. त्यापेक्षा कोकणात चांगला पायंडा पाडत घोडेबाजार रोखला.
