लोणी बुद्रकला 3 वर्षांत 44 गुंठ्यात फुलविली 6 हजार झाडे:स्मशानभूमीत लागवड केलेले ‘मियावाकी’ जंगल गावासाठी ठरतेय ‘ऑक्सिजन बँक’
![]()
वाढते तापमान, घटती वृक्षसंख्या आणि बदलते पर्यावरण यामुळे शुद्ध हवेचा प्रश्न गंभीर बनत असताना वैजापूर तालुक्यातील लोणी बुद्रुक गावाने त्यावर प्रभावी उत्तर शोधले आहे. जिथे पूर्वी शांतता आणि ओसाडपणा होता, त्याच स्मशानभूमी परिसरात आज मियावाकी पद्धतीने उभ
.
स्मशानभूमीची जागा वनराईने व्यापली एकेकाळी दुर्लक्षित असलेली स्मशानभूमीची जागा आता दाट वनराईने व्यापली आहे. गावाने मृतांच्या स्मृती जपत पर्यावरण संवर्धनाची अनोखी वाट निवडली आहे. मियावाकी तंत्रामुळे कमी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन शक्य झाले. घनदाट लागवडीमुळे परिसराला नैसर्गिक संरक्षण कवच मिळाले आहे.
