संख्याबळ नसताना काँग्रेस पराभवासाठी का लढतेय?:राहुल गांधी सोन्याचा चमचा घेऊन मोठे झाले, त्यांना आर्थिक टंचाई काय कळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला
![]()
राहुल गांधी हे सोन्याचा चमच्याने बदमाचा ज्यूस पीत मोठे झाले आहेत. त्यांना आर्थिक टंचाई काय हे माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा विचार केला आहे. देशाची स्थिती भक्कम राहील यासाठी त्यांना मेहनत घेतली आहे, त्यामुळे राहुल गांधींनी यावर बोलणं हास्यास्पद आहे, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अब्दुल सत्तार हे काही नाराज नाही, त्यांची आणि माझी कालच भेट झाली. काही ठिकाणी छोटे-छोटे विषय असतात मतभेद असतात त्यातून काही वक्तव्य केली जातात. पण अब्दुल सत्तार हे सिस्टीमचे लीडर आहेत. त्यांचा मुलचा उमेदवारी अर्ज मागे घेतला जाईल. विदर्भातील 5 ही जागा महायुती जिंकेल चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेस उमेदवार सुद्धा विचार करत आहेत की ही निवडणूक लढवून त्यांना काय फायदा आहे. संख्याबळ नसताना केवळ पराभवाकरता का म्हणून लढतील? संख्याबळाचा इतका मोठा फरक असताना न लढलेले बरे आहे. पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याने निवडणूक काँग्रेसने निवडणूक लढवू नये. विदर्भातील 5 ही जागा महायुती जिंकेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. संख्याबळ नसल्याने काँग्रेसने माघार घ्यावी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ज्यास अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत ते सर्वच उमेदवार अर्ज माघारी घेणारी आहेत. महायुतीचे नेत्यांनी सर्वच अपक्ष उमेदवारांशी चर्चा केली आहे. काँग्रेसला सुद्धा आम्ही विनंती केली आहे की ज्या ठिकाणी संख्याबळ खूपच कमी असेल त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक होऊ द्यावी. ही निवडणूक संख्याबळावर होत असते त्यामुळे भाजप आणि महायुती निवडूण येतांना दिसत आहे. त्यामध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेत्यांनी केला पाहिजे. अपक्ष उमेदवारांवर काय कारवाई करायची बघू चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जे उमेदवार ऐकणार नाही त्यांचे काय करायचे ते बघू. पण जिथे अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहे तिथे उमेदवार मागे घेतील. अपक्ष उमेदवारी मागे घेतली नाही तर काय कारवाई करायची हे त्या त्या पक्षाचे नेते ठरवतील. फार काही बंडखोरी होईल असे वाटत नाही, काहीच जण अपक्ष लढतील. पुणे-नाशिकमध्ये सुद्धा जे अपक्ष उमेदवार आहेत ते सुद्धा त्यांचा उमेदवारी अर्ज आज दुपारी 3 वाजेपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
